• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ : केएल राहुलनेच दिला विराटला धक्का, गप्टीलने मोडलं किंग कोहलीचं वर्ल्ड रेकॉर्ड!

IND vs NZ : केएल राहुलनेच दिला विराटला धक्का, गप्टीलने मोडलं किंग कोहलीचं वर्ल्ड रेकॉर्ड!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टी-20 मध्ये (India vs New Zealand 2nd T20) मार्टिन गप्टीलने (Martin Guptill) इतिहास घडवला आहे. मार्टिन गप्टीलने विराट कोहलीचं (Virat Kohli Record) आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम मोडला आहे.

 • Share this:
  रांची, 19 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टी-20 मध्ये (India vs New Zealand 2nd T20) मार्टिन गप्टीलने (Martin Guptill) इतिहास घडवला आहे. मार्टिन गप्टीलने विराट कोहलीचं (Virat Kohli Record) आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम मोडला आहे. या सामन्यात मार्टिन गप्टीलला विराटचा विक्रम मोडण्यासाठी 11 रनची गरज होती. भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) पहिल्याच ओव्हरमध्ये गप्टीलने तीन फोर मारल्या, पण त्याला केएल राहुलने जीवनदानही दिलं. मिड ऑफवरून मागे धावत जाणाऱ्या केएल राहुलला (KL Rahul) कॅच पकडता आला नाही. यानंतर लगेचच ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर गप्टीलने विराटचं रेकॉर्ड मोडलं. 15 बॉलमध्ये 31 रन करून गप्टील आऊट झाला. गप्टीलने विराटचा टी-20 आंतरराष्ट्रीयमधला 3,227 रनचा विक्रम मोडला. या यादीत रोहित शर्मा 3,086 रनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. गप्टीलकडे जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या टी-20मध्येच विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी होती, पण त्या सामन्यात गप्टील 42 बॉलमध्ये 70 रन करून आऊट झाला. यात 4 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. गप्टीलच्या या खेळीमुळे न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 164 रन केले. भारताने हा सामना 2 बॉल राखत जिंकला. गप्टीलने आतापर्यंत 111 टी-20मध्ये 3,248 रन केले, या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 19 अर्धशतकं आहेत, यात 161 सिक्स आणि 283 फोरचा समावेश आहे. तर विराटने 95 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3,227 रन ठोकले आहेत. विराटने 29 अर्धशतकांसह 290 फोर आणि 91 सिक्सही मारल्या आहेत.
  Published by:Shreyas
  First published: