मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ 2nd T20 : रोहित-राहुलची अर्धशतकं, पंतच्या खणखणीत सिक्स, टीम इंडियाने सीरिजही जिंकली

IND vs NZ 2nd T20 : रोहित-राहुलची अर्धशतकं, पंतच्या खणखणीत सिक्स, टीम इंडियाने सीरिजही जिंकली

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये (India vs New Zealand 2nd T20) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने 7 विकेटने विजय मिळवला आहे, याचसह भारताने टी-20 सीरिजवरही कब्जा केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

रांची, 19 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये (India vs New Zealand 2nd T20) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने 7 विकेटने विजय मिळवला आहे, याचसह भारताने टी-20 सीरिजवरही कब्जा केला आहे. न्यूझीलंडने दिलेल्या 154 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राहुल आणि रोहित यांच्यात 13.2 ओव्हरमध्ये 117 रनची पार्टनरशीप केली. केएल राहुलने 49 बॉलमध्ये 65 आणि रोहितने 36 बॉलमध्ये 55 रन केले. ऋषभ पंतने लागोपाठ दोन सिक्स मारून भारताचा विजय निश्चित केला. न्यूझीलंडकडून फक्त टीम साऊदीच यशस्वी ठरला, त्याला तीन विकेट घेण्यात यश आलं.

त्याआधी भारतीय बॉलर्सनी (India vs New Zealand 2nd T20) टिच्चून बॉलिंग केली, त्यामुळे सीरिज जिंकण्यासाठी भारताला 154 रनचं आव्हान मिळालं. रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर मार्टिन गप्टील (Martin Guptill) आणि डॅरेल मिचेल (Darell Mitchell) यांनी न्यूझीलंडला धमाकेदार सुरुवात करून दिली. या दोन्ही ओपनरमध्ये 4.2 ओव्हरमध्ये 48 रनची पार्टनरशीप केली, यानंतर मात्र न्यूझीलंडच्या दुसऱ्या कोणत्याच खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. मार्टिन गप्टील आणि मिचेलनी प्रत्येकी 31-31 रनची खेळी केली, तर ग्लेन फिलिप्स 34 रन करून आऊट झाला. आपली पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या हर्षल पटेलने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 2 विकेट घेतल्या. भुवनेश्वर, दीपक चहर, अश्विन आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

IND vs NZ : केएल राहुलनेच दिला विराटला धक्का, गप्टीलने मोडलं किंग कोहलीचं वर्ल्ड रेकॉर्ड!

या सामन्यासाठी टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. मोहम्मद सिराजऐवजी हर्षल पटेलची (Harshal Patel) टीममध्ये निवड करण्यात आली आहे. तर न्यूझीलंडने टीममध्ये तब्बल तीन बदल केले.

हर्षल पटेलचं या सामन्यातून टीम इंडियामध्ये आगमन झालं आहे. आयपीएलच्या मागच्या दोन्ही मोसमांमध्ये हर्षल पटेलने उल्लेखनीय कामगिरी केली. आरसीबीकडून खेळताना हर्षल पटेलने या मोसमातल्या 15 सामन्यांमध्ये तब्बल 32 विकेट घेतल्या होत्या. आयपीएल 2021 मध्ये हर्षल पटेल सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू होता.

भारतीय टीम

केएल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, आर.अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल

न्यूझीलंडची टीम

मार्टिन गप्टील, डॅरेल मिचेल, मार्क चॅम्पमन, ग्लेन फिलिप्स, टीम सायफर्ट, जेम्स नीशम, ईश सोढी, मिचेल सॅन्टनर, टीम साऊदी, एडम मिल्ने, ट्रेन्ट बोल्ट

पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा अखेरच्या ओव्हरमध्ये थरारक विजय झाला. अश्विन आणि भुवनेश्वर कुमार भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले, तर सूर्यकुमार यादवने 40 बॉलमध्ये 62 रनची खेळी केली होती. सूर्यकुमार यादवची टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमधली ही सर्वोत्तम कामगिरी होती. आता रांचीमधल्या सामन्यात विजय मिळवत भारताने सीरिजही खिशात टाकली. आता सीरिजची अखेरची टी-20 रविवारी कोलकात्यामध्ये होणार आहे.

First published:

Tags: New zealand, T20 cricket, Team india