रायपूर, 21 जानेवारी : भारताने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सामना 8 गडी राखून जिंकत मालिकासुद्धा खिशात घातली. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने आता 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने न्यूझीलंडला 108 धावात गुंडाळल्यानतंर 2 गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केले. भारताचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक केलं तर विराट कोहली 11 धावा करून बाद झाला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना एकवेळ न्यूझीलंडची अवस्था 5 बाद 15 अशी झाली होती. त्यानतंर ब्रेसवेल, सँटनर आणि फिलिप्स यांनी धावा केल्यानं संघाला शंभरी ओलांडता आली. ब्रेसवेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी पडझड रोखत संघाच्या 50 धावा पूर्ण केल्या. मात्र शमीने पुन्हा एकदा न्यूझीलंडला दणका देत ब्रेसवेलचा अडथळा दूर केला. ब्रेसवेलने 30 चेंडूत 22 धावा केल्या.
हेही वाचा : Dan Christian Retirement: कोहलीचा लाडका मॅचविनर, RCB चा खेळाडूनं तडकाफडकी घेतला संन्यास
ब्रेसवेल बाद झाल्यानंतर मिशेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडचे शतक धावफलकावर लावले. हार्दिक पांड्याने सँटनरचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. तर वॉशइंग्टन सुंदरने ग्लेन फिलिप्सला बाद केलं. सँटनर 27 धावांवर तर फिलिप्स 36 धावांवर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने लॉकी फर्ग्युसनला तर कुलदीप यादवने ब्लेर टिकनरला बाद करून न्यूझीलंडचा डाव 108 धावांवर संपुष्टात आणला.
पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने न्यूझीलंडला दणका दिला. त्याने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर फिन एलनला बोल्ड केलं. त्यानंतर सहाव्या षटकात मोहम्मद सिराजने हेन्री निकोलसला शुभमन गिलच्या हाती झेल देत बाद केले. तर शमीने पुन्हा एकदा न्यूझीलंडला धक्का देताना डेरिल मिशेलची विकेट काढली. त्याने स्वत:च्याच गोलंदाजीवर मिशेलचा झेल घेतला.
हेही वाचा : न्यूझीलंडवर आतापर्यंत अशी वेळ कधीच आली नव्हती, नावावर नकोसा रेकॉर्ड
भारताचा अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याने दहाव्या षटकात डेवॉन कॉनवेला बाद केलं. त्याने 16 चेंडूत 7 धावा केल्या होत्या. हार्दिक पांड्यानेच त्याचा झेल टिपला. तर त्यानंतर शार्दुल ठाकुरने टॉम लाथमला शुभमन गिलकरवी झेलबाद केलं. 11 षटकात न्यूझीलंडची अवस्था 5 बाद 15 अशी झाली आहे. ग्लेन फिलिप्स आणि मायकल ब्रेसवेल मैदानात आहेत. पहिल्या सामन्यात ब्रेसवेलने तुफान फटकेबाजी करत न्यूझीलंडला विजयापर्यंत नेलं होतं.
भारताचा संघ
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
न्यूझीलंडचा संघ
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (डब्ल्यू/सी), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सॅंटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket