Home /News /sport /

'ओ छम छम नचने लगा..' गाण्याच्या डान्सचा VIDEO शेअर करत हिटमॅनने Shreyas Iyerचे केले कौतुक

'ओ छम छम नचने लगा..' गाण्याच्या डान्सचा VIDEO शेअर करत हिटमॅनने Shreyas Iyerचे केले कौतुक

Shreyas Iyer

Shreyas Iyer

मुंबईकर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) कानपूरमध्ये टेस्ट क्रिकेट पदार्पणातच आपले पहिले वहिले शतक झळकावले.

  कानपूर, 26 नोव्हेंबर: मुंबईकर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) कानपूरमध्ये टेस्ट क्रिकेट पदार्पणातच आपले पहिले वहिले शतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे क्रिकेट जगतात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Shara) बॉलीवूडच्या गाण्यावर अय्यरसोबत थिरकलेला व्हिडीओ शेअर करत त्याच्या खेळीचे कौतुक केले आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. श्रेयस अय्यरने 171 चेंडूत 105 धावा केल्या. 13 चौकार आणि 2 षटकार मारले. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर टीम साऊदीने त्याला बाद केले. पदार्पणाच्या या तुफानी खेळीमुळे अय्यरने सर्वांच्या मनावर राज्य केले. दरम्यान, रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर, आणि श्रेयस अय्यर दिसत आहेत.
  हे तिघे 'कोई सहरी बाबू दिल-लहरी बाबू हाय र' या गाण्यावर थिरकतान दिसत आहेत. हा व्हिडीओ शेआर करत रोहितने अय्यरच्या तुफानी खेळीचे कौतुक केले आहे. रोहितने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सुरुवात झाली. न्यूझीलंडने दुसरे आणि तिसरे सत्र यशस्वीरित्या खेळून काढत बिनबाद 129 धावा करून दुसरा दिवस आपल्या नावावर केला आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Rohit sharma, Shardul Thakur, Shreyas iyer

  पुढील बातम्या