कानपूर, 28 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या (India vs New Zealand 1st Test) चौथ्या दिवशी अंपायरचा निर्णय आणि डीआरएसचा (DRS) वाद पाहायला मिळाला. दिवसाचा खेळ संपत असतानाच आर.अश्विनच्या (R Ashwin) बॉलिंगवर अंपायर वीरेंद्र शर्मा (Umpire Virender Sharma) यांनी विल यंग (Will Young) याला एलबीडब्ल्यू आऊट दिलं. यंगला आऊट दिल्यानंतर तो डीआरएस घ्यायचा का नाही, याबाबत नॉन स्ट्रायकर एण्डला उभ्या असणाऱ्या टॉम लेथमसोबत चर्चा करत होता. यानंतर यंगने डीआरएससाठी इशारा केला, पण तोपर्यंत 15 सेकंदाचा वेळ निघून गेला होता, त्यामुळे यंगला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. यंगने जेव्हा डीआरएस घ्यायचा इशारा केला तेव्हा रहाणेने (Ajinkya Rahane) टाईम हो गया, टाईम हो गया, असं सांगत डीआरएसवर आक्षेप घेतले, तसंच ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या राहुल द्रविडनेही (Rahul Dravid) नकारार्थी मान हलवली.
विल यंग याने डीआरएस घेताना चूक केली असली तरी त्याआधी अंपायर वीरेंद्र शर्मा यांनीही मोठी चूक केली. रिप्ले बघितल्यानंतर अंपायरची ही चूक लक्षात आली. अश्विनने टाकलेला बॉल लेग स्टम्पच्याही बाहेर जात असल्याचं रिप्लेमध्ये निष्पन्न झालं. 2 रन करून विल यंग आऊट झाला.
Will young is gone he has reviewed but the time's up#INDvsNZTestSeries #INDvsNZ pic.twitter.com/VIiEncGGGf
— WORLD TEST CHAMPIONSHIP NEWS (@RISHItweets123) November 28, 2021
दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडचा स्कोअर 4/1 एवढा झाला आहे. पाचव्या म्हणजेच अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी आणखी 280 रनची गरज आहे. त्याआधी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये संकटातून बाहेर पडली.
पहिल्या इनिंगमध्ये शतक करणाऱ्या श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक केलं, तर ऋद्धीमान साहादेखील (Wriddhiman Saha) अर्धशतक करून नाबाद राहिला. 234/7 वर भारताने इनिंग घोषित केली, त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 284 रनचं आव्हान मिळालं.
चौथ्या दिवसाची सुरुवात 14/1 अशी करणाऱ्या टीम इंडियाची अवस्था खराब झाली होती. 51 रनवरच टीमच्या 5 विकेट गेल्या होत्या, पण श्रेयस अय्यर, अश्विन, साहा आणि अक्षर पटेल यांनी टीमला वाचवलं. श्रेयस अय्यर 65 रन करून, तर अश्विन 32 रनवर आऊट झाला. ऋद्धीमान साहा 61 रनवर आणि अक्षर पटेल (Axar Patel) 28 रनवर नाबाद राहिले.
पहिल्या इनिंगमध्ये 345 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडला 296 रनवर रोखलं, त्यामुळे भारताला 49 रनची आघाडी मिळाली. अक्षर पटेलने न्यूझीलंडच्या 5 विकेट घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, Team india