INDvsNZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड उद्या पहिली कसोटी, इथं पाहू शकता LIVE

INDvsNZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड उद्या पहिली कसोटी, इथं पाहू शकता LIVE

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे.

  • Share this:

वेलिंग्टन, 20 फेब्रुवारी : न्यूझीलंड दौऱ्यावर असेलेल्या भारतीय संघ शुक्रवारपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना वेलिंग्टन इथं खेळला जाईल. भारताने न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेत 5-0 ने ऐतिहासिक विजय साजरा केला. मात्र त्यानंतर एकदिवसीय मालिका 3-0 ने गमावली. कसोटी मालिकेआधी भारताने तीन दिवसीय सराव सामना खेळला. सराव सामन्यात हनुमा विहारीने शतकी खेळी केली तर जसप्रीत बुमराहने चांगली गोलंदाजी केली. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने गेल्या सात सामन्यात विजय मिळवला असून त्यात चार वेळा डावाने प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं आहे.

भारत - न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना बेसिन रिझर्व्ह स्टेडियममध्ये होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टसच्या इंग्रजी, हिंदी आणि एचडी चॅनेलवरून होईल.

पहिल्या कसोटी सामन्याच्या लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. हॉटस्टारवर याचे स्ट्रीमिंग होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 4 वाजता सामना सुरु होणार आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळतो असं मानलं जातं. पण भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात मात्र वातावरण वेगळं आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असे आहेत. त्यामुळे कोणत्याच संघाला विजयाचा दावेदार मानता येणार नाही.

न्यूझीलंडच्या संघाने घरच्या मैदानावर गेल्या 14 कसोटी मालिकांपैकी केवळ दोन मालिका गमावल्या आहेत. भारतानंतर घरेलू मैदानावर अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा नंबर लागतो. 2018 नंतर भारताने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावली नाही तर न्यूझीलंडने 2017 मध्ये शेवटचा पराभव पत्करला होता.

वाचा : मॉडेलच्या हॉट डान्सने युजवेंद्र चहल घाबरला आणि पळत सुटला, पाहा हा VIDEO

वेलिंग्टनच्या मैदानावर फलंदाजांसाठी प्रतिकूल वातावरण असेल. खेळपट्टीवर अर्ध्या इंचापेक्षा जास्त गवत असेल. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला गोलंदाजांसमोर टिकून राहण्याचं आव्हान असेल. तिसऱ्या दिवशी खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असेल.

'सिनिअर-ज्युनिअर मुद्दाच नाही, पंतने स्वीकारावं की...',रहाणेनं दिला सल्ला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची असणार आहे. आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये न्यूझीलंडचे मोठे आव्हान भारताला आहे. सध्या भारताचे 360 गुण झाले असून कागदावर तरी न्यूझीलंडपेक्षा भारत पुढे आहे. तर न्यूझीलंडला घरच्या मैदानाचा फायदा आहे.

वाचा : सुरेश रैनाचं क्रश मराठमोळी अभिनेत्री, डेट करण्याची होती इच्छा

First published: February 20, 2020, 9:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या