मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ 1st Test : शतक आणि अर्धशतकाच्या विक्रमी खेळीनंतरही अय्यर नाराज, या गोष्टीवर घेतला आक्षेप

IND vs NZ 1st Test : शतक आणि अर्धशतकाच्या विक्रमी खेळीनंतरही अय्यर नाराज, या गोष्टीवर घेतला आक्षेप

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs New Zealand 1st Test) चौथ्या दिवशी उशिरा डावाची घोषणा केली, यासाठी श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) खेळपट्टीकडून बॉलर्सना जास्त मदत मिळत नसल्याचं कारण दिलं आहे.

  • Published by:  Shreyas

कानपूर, 28 नोव्हेंबर : पदार्पणाच्या टेस्टमध्येच शतक केल्यानंतर श्रेयस अय्यरने दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक केलं. हा विक्रम करणारा श्रेयस अय्यर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतरही श्रेयस अय्यरने नाराजी व्यक्त केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs New Zealand 1st Test) चौथ्या दिवशी उशिरा डावाची घोषणा केली, यासाठी श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) खेळपट्टीकडून बॉलर्सना जास्त मदत मिळत नसल्याचं कारण दिलं आहे. भारताने दुसरी इनिंग 234/7 वर घोषित केली, त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 284 रनचं आव्हान मिळालं. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडचा स्कोअर 4/1 एवढा झाला होता. अश्विनने विल यंगला एलबीडब्ल्यू आऊट केलं.

'खेळपट्टीवर बॉल जास्त हलत नाहीये. आम्हाला एका आव्हानात्मक स्कोअरची गरज होती. आम्ही चांगला स्कोअर केला आहे, तसंच टीमकडे चांगले स्पिनरही आहेत, त्यामुळे उद्या काम पूर्ण होईल, अशी आशा आहे. आम्हाला स्पिनरवर विश्वास दाखवावा लागेल. न्यूझीलंडची टीम शेवटच्या दिवशी दबावात असेल. 250 पेक्षा जास्तची आघाडी या खेळपट्टीवर जास्त आहे,' असं अय्यर म्हणाला.

चौथ्या दिवसाची सुरुवात 14/1 अशी करणाऱ्या टीम इंडियाची अवस्था खराब झाली होती. 51 रनवरच टीमच्या 5 विकेट गेल्या होत्या, पण श्रेयस अय्यर, अश्विन, साहा आणि अक्षर पटेल यांनी टीमला वाचवलं.

श्रेयस अय्यर 65 रन करून, तर अश्विन 32 रनवर आऊट झाला. ऋद्धीमान साहा 61 रनवर आणि अक्षर पटेल (Axar Patel) 28 रनवर नाबाद राहिले. न्यूझीलंडकडून टीम साऊदी (Tim Southee) आणि काईल जेमिसन (Kyle Jamieson) यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या आणि एजाझ पटेलला एक विकेट घेण्यात यश आलं.

First published: