कानपूर, 29 नोव्हेंबर : टीम इंडियाचा महान खेळाडू राहुल द्रविड (Rahul Dravid) त्याचा शांत स्वभाव आणि उत्कृष्ट कोचिंगसाठी ओळखला जातो. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टनंतर India vs New Zealand 1st Test) द्रविडने मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे भारतीय क्रिकेटचे चाहते त्याला सलाम करत आहेत. मॅच संपल्यानंतर द्रविडने कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमच्या ग्राऊंड्समनना 35 हजार रुपये दिले. 5 दिवस चांगलं काम आणि चांगली खेळपट्टी तयार केल्याबद्दल द्रविडने हे गिफ्ट दिलं. मॅचच्या अखेरच्या दिवशी न्यूझीलंडच्या बॅटरनी 94 ओव्हर बॅटिंग केली आणि फक्त 8 विकेट गमावल्या, त्यामुळे 2 टेस्ट मॅचची ही सीरिज आता 0-0 ने बरोबरीत आहे. अखेरची टेस्ट 3 डिसेंबरपासून मुंबईमध्ये सुरू होईल.
मॅच संपल्यानंतर उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (UPCA) च्या अधिकाऱ्यांनी याची घोषणा केली. राहुल द्रविडने 35 हजार रुपयांची ही रक्कम स्वत:च्या खिशातून दिली. 5 दिवस चाललेल्या या सामन्यात भारतीय बॉलर्सनी 19 विकेट घेतल्या. तर न्यूझीलंडच्या बॉलरना 17 विकेट मिळाल्या. मॅचमध्ये बॅटर आणि बॉलर यांचा बोलबाला होता. कोच म्हणून राहुल द्रविडची ही पहिली टेस्ट सीरिजही आहे.
अखेरच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 9 विकेटची गरज होती. आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे तीन स्पिनर टीम इंडियाकडे उपलब्ध होते, पण तरीही टीमला 8 विकेटच घेता आल्या. टीम इंडियाने उशीरा इनिंग घोषित केल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चौथ्या दिवशी न्यूझीलंडला फक्त 4 ओव्हरच बॅटिंगची संधी मिळाली.
3 डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहलीचं पुनरागमन होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धची 3 टी-20 मॅचची सीरिज आणि पहिली टेस्ट खेळला नव्हता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.