कानपूर, 29 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट (India vs New Zealand Kanpur Test) मॅच ड्रॉ झाली. शेवटच्या दिवशी 284 रनच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने 155 रनवर 9 विकेट गमावल्या. भारताला फक्त एका विकेटची गरज होती, पण न्यूझीलंडचे रचिन रविंद्र (Rachin Ravindra)आणि एजाझ पटेल (Ajaz Patel) 52 बॉल खेळपट्टीवर टिकून राहिले आणि त्यांनी मॅच ड्रॉ केली. तळाशी खेळणाऱ्या या दोघांनी 8.4 ओव्हर किल्ला लढवला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला हा सामना ड्रॉ झाल्यामुळे भारताला मोठा फटका बसणार आहे.
भारत-न्यूझीलंड यांच्यातली ही टेस्ट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (World Test Championship) भाग आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये प्रत्येक मॅच जिंकल्यानंतर टीमला 12 पॉईंट्स, मॅच टाय झाली तर 6 पॉईंट्स, तसंच मॅच ड्रॉ झाली तर 4 पॉईंट्स मिळतात. टीमने मॅच गमावली तर मात्र टीमला एकही पॉईंट मिळत नाही. तसंच टीमने मॅच जिंकल्यानंतर 100 परसेंटेज पॉईंट्स, मॅच टाय झाली तर 50 परसेंटेज पॉईंट्स, मॅच ड्रॉ झाल्यास 33.33 परसेंटेज पॉईंट्स दिले जातात. सामना गमावल्यानंतर मात्र टीमला शून्य परसेंटेज पॉईंट्स मिळतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अखेरीस ज्या टीमचे परसेंटेज पॉईंट्स जास्त असतील त्या दोन टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळतात.
Here's how the teams stack up in the #WTC23 standings after that thrilling draw between India and New Zealand in Kanpur 👀 pic.twitter.com/VxGmkMlbfQ
— ICC (@ICC) November 29, 2021
सध्याच्या क्रमवारीमध्ये श्रीलंकेची टीम पहिल्या, भारत दुसऱ्या, पाकिस्तान तिसऱ्या, वेस्ट इंडिज चौथ्या, न्यूझीलंड पाचव्या आणि इंग्लंड सहाव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचे परसेंटेज पॉईंट्स 100 आहेत, कारण त्यांनी एक सामना खेळला असून त्यात विजय मिळवला आहे. भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 5 पैकी 2 मॅच जिंकल्या आणि 2 मॅच ड्रॉ केल्या, तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला. भारताचे परसेंटेज पॉईंट्स 50 आहेत, तर पॉईंट्स 30 आहेत.
सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये टेस्ट मॅच सुरू आहे. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानला विजयसाठी 93 रनची गरज आहे. पाकिस्तानने हा सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तानची टीम भारताच्या पुढे जाईल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली दुसरी टेस्ट 3 डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार आहे. या टेस्टमधून विराट कोहलीचं टीम इंडियामध्ये पुनरागमन होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर विराटला विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धची तीन टी-20 मॅचची सीरिज आणि पहिली टेस्ट खेळला नव्हता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.