कानपूर, 23 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 3-0 ने विजय मिळवल्यानंतर आता भारतीय टीम (India vs New Zealand) पहिल्या टेस्टसाठी कानपूरला (Kanpur Test) रवाना झाली आहे. 2 टेस्ट मॅचच्या सीरिजची पहिली टेस्ट 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, पण या टेस्ट मॅचआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ओपनर केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे ही सीरिज खेळू शकणार, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. केएल राहुलऐवजी सूर्यकुमार यादवची टीममध्ये निवड झाली आहे. केएल राहुलच्या मांडीला दुखापत झाल्यामुळे तो टेस्ट सीरिजला मुकणार आहे. दुखापतीच्या उपचारासाठी राहुल एनसीएमध्ये जाणार आहे. पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीची तयारीही राहुल तिकडेच करणार आहे.
India batter KL Rahul ruled out of first Test against New Zealand due to injury: BCCI sources
— Press Trust of India (@PTI_News) November 23, 2021
इंग्लंड दौऱ्यातून केएल राहुलने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या दौऱ्यात राहुल चांगलाच फॉर्ममध्ये होता, त्याने या दौऱ्यातल्या टेस्टमध्ये शतकही झळकावलं. तसंच टी-20 क्रिकेटमध्येही त्याने आपला फॉर्म कायम ठेवला. न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20 मधून राहुलला विश्रांती देण्यात आली होती, त्याआधी झालेल्या 5 टी-20 पैकी 4 सामन्यांमध्ये राहुलने अर्धशतकं केली होती.
न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आली आहे, तर विराट कोहली (Virat Kohli) पहिली टेस्ट खेळणार नाही. त्यामुळे दोन्ही महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये आता केएल राहुलसारख्या महत्त्वाच्या खेळाडूचं नसणं टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. केएल राहुल पहिली टेस्ट खेळणार नसल्यामुळे मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) ओपनिंगला खेळतील हे जवळपास निश्चित आहे. तर दुसरीकडे मधल्या फळीत विराटऐवजी टीमकडे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे दोन पर्याय आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kl rahul, New zealand, Team india