मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Akshar चा असा झाला Axar! त्या एका चुकीमुळे बदललं अक्षर पटेलचं आयुष्य

Akshar चा असा झाला Axar! त्या एका चुकीमुळे बदललं अक्षर पटेलचं आयुष्य

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs New Zealand) डावखुरा स्पिनर अक्षर पटेल (Axar Patel) याने धमाकेदार कामगिरी केली आहे. मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये अक्षर पटेलने 62 रन देऊन 5 विकेट घेतल्या.

  • Published by:  Shreyas

कानपूर, 27 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs New Zealand) डावखुरा स्पिनर अक्षर पटेल (Axar Patel) याने धमाकेदार कामगिरी केली आहे. मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये अक्षर पटेलने 62 रन देऊन 5 विकेट घेतल्या. अक्षर पटेलच्या या कामगिरीमुळे भारताने सामन्यामध्ये पुनरागमन केलं. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाने केलेल्या 345 रननंतर बॅटिंगला आलेल्या किवी टीमने दिमाखदार सुरुवात केली. ओपनर टॉम लेथम आणि विल यंग यांच्यामध्ये 151 रनची पार्टनरशीप झाली. लॅथम 95 रन करून तर विल यंग 89 रन करून आऊट झाले. अक्षरने टॉम लेथमला विकेट कीपर श्रीकर भरत कडून स्टम्पिंग केलं. यानंतर त्याने रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडल आणि टीम साऊदीची विकेट घेतली.

अक्षर पटेलने 4 टेस्टच्या 7 इनिंगमध्ये 10.87 ची सरासरी आणि 30.3 च्या स्ट्राईक रेटने 32 विकेट घेतल्या. यात 5 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट आणि मॅचमध्ये एकदा 10 विकेटचा समावेश आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रविंद्र जडेजाला दुखापत झाल्यामुळे अक्षर पटेलला इंग्लंडविरुद्ध भारतात झालेल्या टेस्ट सीरिजमधून पदार्पणाची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच टेस्ट सीरिजमध्ये अक्षर पटेलने धमाका केला. इंग्लंडविरुद्धच्या 3 टेस्टमध्ये त्याने तब्बल 27 विकेट घेतल्या. आपल्या पहिल्याच टेस्टच्या इनिंगमध्ये 5 विकेट घेण्याचा करिश्माही अक्षर पटेलने केला.

याशिवाय अक्षर पटेलने 38 वनडे आणि 15 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचही खेळल्या. यात त्याला वनडेमध्ये 45 आणि टी-20 मध्ये 13 विकेट मिळाल्या. आयपीएलमध्ये अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएलच्या पुढच्या मोसमाआधी दिल्लीची टीम अक्षर पटेलला रिटेन करण्याचीही शक्यता आहे.

अक्षरच्या नावाची कहाणी

अक्षर पटेल याचं नाव खरं तर आधी Akshar असं होतं, पण शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याचा शाळेच्या दाखल्यावर त्याचं नाव Axar असं लिहिलं. मुख्याध्यापकांनी चुकीचं नाव लिहिलं असलं तरी अक्षरने या नावात कोणताही बदल न करता चुकीचंच नाव पुढे कायम करण्याचा निर्णय घेतला.

First published:

Tags: New zealand, Team india