मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ 1st Test : पहिल्या सामन्याच्या मध्यातच संपलं भारतीय खेळाडूचं करियर, पुन्हा मिळणार नाही संधी!

IND vs NZ 1st Test : पहिल्या सामन्याच्या मध्यातच संपलं भारतीय खेळाडूचं करियर, पुन्हा मिळणार नाही संधी!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या ग्रीनपार्कमध्ये पहिली टेस्ट मॅच (India vs New Zealand 1st Test) सुरू आहे. तिसऱ्या दिवशी भारताने मॅचवर आपली पकड मजबूत केली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या ग्रीनपार्कमध्ये पहिली टेस्ट मॅच (India vs New Zealand 1st Test) सुरू आहे. तिसऱ्या दिवशी भारताने मॅचवर आपली पकड मजबूत केली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या ग्रीनपार्कमध्ये पहिली टेस्ट मॅच (India vs New Zealand 1st Test) सुरू आहे. तिसऱ्या दिवशी भारताने मॅचवर आपली पकड मजबूत केली आहे.

कानपूर, 27 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या ग्रीनपार्कमध्ये पहिली टेस्ट मॅच (India vs New Zealand 1st Test) सुरू आहे. तिसऱ्या दिवशी भारताने मॅचवर आपली पकड मजबूत केली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 14/1 एवढा झाला आहे, तसंच टीमची आघाडी 63 रन झाली आहे. पहिल्या इनिंगमध्ये 345 रन केल्यानंतर भारतीय बॉलर्सनी न्यूझीलंडचा 296 रनवर ऑल आऊट केलं. अक्षर पटेलने (Axar Patel) 5 विकेट घेतल्या, तर आर.अश्विनला 3 विकेट मिळाल्या. उमेश यादव आणि रविंद्र जडेजाला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. विकेट कीपर श्रीकर भरतने (Srikar Bharat) एक स्टम्पिंग आणि दोन कॅच पकडले. श्रीकर भरतने केलेल्या विकेट कीपिंगबद्दल त्याचं कौतुक होत आहे.

खरंतर श्रीकर भरत याची या सामन्याच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली नव्हती, पण ऋद्धीमान साहाच्या (Wriddhiman Saha) मानेच्या दुखापतीमुळे तो मैदानात उतरू शकला नाही, त्यामुळे साहाच्या ऐवजी श्रीकर भरत विकेट कीपिंगसाठी मैदानात उतरला. दुसऱ्या दिवशी साहाने 55 ओव्हर कीपिंग केली, पण तिसऱ्या दिवशी भरत विकेट कीपिंगचे ग्लोव्हज घालून मैदानात आला. भारताच्या बॅटिंगवेळी पहिल्या इनिंगमध्ये ऋद्धीमान साहा 1 रन करून आऊट झाला. मॅचच्या मध्येच दुखापत झाल्यामुळे ऋद्धीमान साहा याच्यासाठी ही टेस्ट मॅच करियरमधली अखेरची ठरू शकते.

न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी ऋषभ पंत याला आराम देण्यात आला आहे. या सीरिजनंतर पंत पुन्हा मैदानात उतरेल, तसंच श्रीकर भरतने या टेस्टमध्येच नाही तर प्रथम श्रेणी क्रिकेट आणि आयपीएलमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ऋद्धीमान साहाने 2010 साली टीम इंडियात पदार्पण केलं, पण एमएस धोनी असल्यामुळे त्याला फार खेळण्याची संधी मिळाली नाही. ऋद्धीमान साहा याचं वय 37 वर्ष आहे, तसंच श्रीकर भरत युवा आहे, त्यामुळे निवड समिती भविष्यातल्या सीरिजसाठी भरत आणि पंत यांचा विचार करण्याची शक्यता आहे.

भरतचं प्रथम श्रेणी करियर

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये श्रीकर भरतने 78 सामन्यांमध्ये 37.24 च्या स्ट्राईक रेटने 4.283 रन केले, यामध्ये 9 शतकं आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. 28 वर्षांच्या भरतने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 270 कॅच आणि 31 स्टम्पिंग केले आहेत. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये भरतने 5 मॅचमध्ये 131 रन केले. जम्मू काश्मीरविरुद्ध त्याने 70 रनची आणि झारखंडविरुद्ध 48 रनची खेळी केली.

आयपीएलच्या या मोसमात श्रीकर भरत आरसीबीकडून खेळला होता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात भरतने नाबाद 78 रनची उल्लेखनीय खेळी केली होती.

First published:

Tags: New zealand, Team india