मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ 1st Test : लास्ट बॉल थ्रिलर! एका विकेटने निसटला टीम इंडियाचा विजय

IND vs NZ 1st Test : लास्ट बॉल थ्रिलर! एका विकेटने निसटला टीम इंडियाचा विजय

Photo-BCCI

Photo-BCCI

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली पहिली टेस्ट (India vs New Zealand 1st Test) ड्रॉ झाली आहे. शेवटच्या बॉलपर्यंत रोमांचक झालेल्या या टेस्टमध्ये अखेरची विकेट घेण्यात टीम इंडियाला अपयश आलं.

  • Published by:  Shreyas

कानपूर, 29 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली पहिली टेस्ट (India vs New Zealand 1st Test) ड्रॉ झाली आहे. शेवटच्या बॉलपर्यंत रोमांचक झालेल्या या टेस्टमध्ये अखेरची विकेट घेण्यात टीम इंडियाला अपयश आलं. भारताने दिलेल्या 284 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था 89.2 ओव्हरमध्ये 155/9 अशी झाली होती, पण रचिन रविंद्र आणि एजाज पटेल यांनी पुढच्या 9 ओव्हर एकही विकेट न गमावता मैदानात झुंज दिली.

दिवसाची सुरुवात न्यूझीलंडने 4/1 अशी केली होती. चौथ्या दिवशी खेळ संपण्यापूर्वी बॅटींगला आलेल्या विल्यम समरविले (William Somerville) नाईट वॉचमनने भारतीय बॉलर्सची चांगलीच परीक्षा घेतली. त्याने टॉम लॅथमच्या (Tom Latham) मदतीने पहिल्या सत्रात किल्ला लढवला. या दोघांनी लंचपर्यंत खेळून काढले. लंचसाठी खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडनं 1 आऊट 79 रन काढले होते.

लंचनंतर लगेच उमेश यादवनं (Umesh Yadav) समरविलेला आऊट करत टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत असलेली जोडी फोडली. समरविलेनंतर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) बॅटींगसाठी आला. त्यानं आणि लॅथमनं संथ बॅटींग करत मॅच ड्रॉ करण्याचा न्यूझीलंडचा इरादा जाहीर केला. लॅथमनं पहिल्या इनिंगप्रमाणे दुसऱ्या इनिंगमध्येही अर्धशतक झळकावले. अनुभवी स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) लॅथमला आऊट केलं.

टी टाईमला काही मिनिटे बाकी असताना रविंद्र जडेजानं अनुभवी रॉस टेलरला (Ross Taylor) आऊट करत टीम इंडियाचा चौथं यश मिळवून दिलं. टी टाईमनंतर अक्षर पटेलनं (Axar Patel) या इनिंगमधील त्याची पहिली विकेट घेतली. त्याने निकेल्सला आऊट केले निकोल्सची विकेट गेल्यानंतर जडेजानं (Ravindra Jadeja) टीम इंडियाला सर्वात मोठं यश मिळवून दिलं. त्यानं एक बाजू लावून धरलेल्या केन विल्यमसनला आऊट केलं. विल्यमसन 24 रन काढून आऊट झाला. तर अश्विननं ब्लंडेलला आऊट करत टीम इंडियाला सातवं यश मिळवून दिलं. यानंतर जडेजाने काईल जेमिसन आणि टीम साऊदीलाही माघारी पाठवलं, पण शेवटची विकेट घेण्यात भारताला अपयश आलं.

भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर आर.अश्विनला 3 विकेट मिळाल्या. अक्षर पटेल आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

या सामन्यात टीम इंडियाने पहिले टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) शतक झळकावत भारताला 345 रनपर्यंत पोहोचवलं. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या न्यूझीलंडचा 296 रनवर ऑल आऊट झाला, ज्यामुळे भारताला 49 रनची आघाडी मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये शतक करणाऱ्या श्रेयस अय्यरने दुसऱ्या इनिंगमध्येही अर्धशतक केलं, त्याचसोबत विकेट कीपर ऋद्धीमान साहा यालाही अर्धशतक करण्यात यश आलं. भारताने 234/7 वर इनिंग घोषित केली, त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 284 रनचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 165/9 पर्यंत मजल मारली.

First published: