मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : कानपूर टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर अंपायर नितीन मेनन निशाण्यावर, जाणून घ्या कारण

IND vs NZ : कानपूर टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर अंपायर नितीन मेनन निशाण्यावर, जाणून घ्या कारण

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट (India vs New Zealand Kanpur Test) मॅच ड्रॉ झाली. यानंतर अंपायर नितीन मेनन यांच्यावर भारतीय चाहते टीका करत आहेत. सोशल मीडियावर नितीन मेनन (Nitin Menon) यांना ट्रोल केलं जात आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

कानपूर, 29 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट (India vs New Zealand Kanpur Test) मॅच ड्रॉ झाली. शेवटच्या दिवशी 284 रनच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने 155 रनवर 9 विकेट गमावल्या. भारताला फक्त एका विकेटची गरज होती, पण न्यूझीलंडचे रचिन रविंद्र (Rachin Ravindra)आणि एजाझ पटेल (Ajaz Patel) 52 बॉल खेळपट्टीवर टिकून राहिले आणि त्यांनी मॅच ड्रॉ केली. तळाशी खेळणाऱ्या या दोघांनी 8.4 ओव्हर किल्ला लढवल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, पण अंपायर नितीन मेनन यांच्यावर भारतीय चाहते टीका करत आहेत. सोशल मीडियावर नितीन मेनन यांना ट्रोल केलं जात आहे.

कानपूर टेस्टच्या अखेरच्या काही ओव्हरमध्ये अंपायर नितीन मेनन (Nitin Menon) लाईट मीटरचा वापर करून वारंवार प्रकाश तपासत होते. न्यूझीलंडच्या दुसऱ्या इनिंगच्या 95 व्या ओव्हरदरम्यानही नितीन मेनन यांनी लाईट मीटर बाहेर काढला, यानंतर भारतीय खेळाडूंनी आक्षेप घेतला. ढगाळ वातावरणात अचानक सूर्य प्रकाश दिसू लागल्यानंतरही नितीन मेनन यांनी लाईट मीटर बाहेर काढला. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने आता जास्त प्रकाश पडला आहे, असं वक्तव्य केलं. अजिंक्य रहाणेचं हे वक्तव्य स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झालं. यानंतर पुन्हा एकदा खेळाला सुरुवात झाली. 98 ओव्हर संपल्यानंतर अंपायर मेनन किवी टीमच्या बॅटरशी बोलायला गेले, तेव्हा भारतीय फिल्डरही त्यांच्याशी चर्चा करायला गेले.

नितीन मेनन यांनी मॅच संपल्याची घोषणा केली, यानंतर ट्विटरवर ते ट्रोल होऊ लागले. नितीन मेनन वारंवार लाईट मीटरने प्रकाश तपासत असल्यामुळे भारतीय चाहते नाराज झाले.

एका यूजरने नितीन मेनन यांचा विराट कोहलीसोबतचा एक जुना फोटो शेयर केला. विराट कोहली ही मॅच खेळत नव्हता ते बरं झालं, असं हा यूजर म्हणाला. तसंच ही टेस्ट ड्रॉ झाली तर नितीन मेनन यांना रोषाचा सामना करावा लागेल, असं ट्वीट एकाने केलं होतं.

कानपूर टेस्टमध्येच नितीन मेनन आणि भारताचा स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) यांच्यातही वाद झाला होता, त्यावेळी प्रकरण शांत करण्यासाठी कोच राहुल द्रविडना आणि मॅच रेफ्री जवागल श्रीनाथ यांच्यासोबत चर्चा करावी लागली होती.

First published: