• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ : रामाचं भजन आणि भगवा गमछा! कानपूरमध्ये असं झालं न्यूझीलंड टीमचं स्वागत, VIDEO

IND vs NZ : रामाचं भजन आणि भगवा गमछा! कानपूरमध्ये असं झालं न्यूझीलंड टीमचं स्वागत, VIDEO

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला (India vs New Zealand Test Series) गुरूवार 25 नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. सीरिजची पहिली टेस्ट कानपूरच्या ग्रीनपार्कमध्ये होणार आहे, त्यामुळे दोन्ही टीम कानपूरमध्ये दाखल झाल्या आहेत.

 • Share this:
  कानपूर, 24 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला (India vs New Zealand Test Series) गुरूवार 25 नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. सीरिजची पहिली टेस्ट कानपूरच्या ग्रीनपार्कमध्ये होणार आहे, त्यामुळे दोन्ही टीम कानपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. जेव्हा खेळाडू टीम हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचं स्वागत भगव्या रंगाने करण्यात आलं. या सामन्यात अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे, कारण विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली आहे. विराट मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमधून पुनरागमन करेल. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर खेळाडूंचं भगवा गमछा गळ्यात घालून स्वागत करण्यात आलं. हॉटेलच्या साऊंड सिस्टीममध्ये राम-राम जय सीता-राम हे भजन लावण्यात आलं होतं. टेस्ट सीरिजमध्ये न्यूझीलंड टीमचं नेतृत्व केन विलियमसनकडे आहे. विलियमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडची टीम नुकतीच टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळली होती, पण ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला.
  दोन्ही टीमच्या खेळाडूंनी कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये सरावही केला. बीसीसीआयने खेळाडूंच्या सरावाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. याशिवाय न्यूझीलंडच्या खेळाडूंनीही काही फोटो पोस्ट केले आहेत, यात केन विलियमसनसह किवी टीमचे इतर खेळाडू घाम गाळताना दिसत आहेत. भारताचा ओपनर केएल राहुल दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर झाला आहे, त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली आहे. पहिल्या टेस्टमध्ये श्रेयस अय्यर खेळेल, असं अजिंक्य रहाणेने सांगितलं आहे, त्यामुळे हा श्रेयस अय्यरची ही पदार्पणाची टेस्ट मॅच असेल. याशिवाय रोहित शर्मा यालाही टेस्ट सीरिजमधून विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने न्यूझीलंडला टी-20 सीरिजमध्ये 3-0 ने व्हाईट वॉश केलं होतं.
  Published by:Shreyas
  First published: