मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ 1st Test : अक्षर पटेलच्या 'पंच'मुळे किवी आपटले, टीम इंडियाचं कमबॅक!

IND vs NZ 1st Test : अक्षर पटेलच्या 'पंच'मुळे किवी आपटले, टीम इंडियाचं कमबॅक!

अक्षर पटेल (Axar Patel) याने केलेल्या धमाकेदार कामगिरी करत न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs New Zealand 1st Test) टीम इंडियाने पुनरागमन केलं आहे.

  • Published by:  Shreyas

कानपूर, 27 नोव्हेंबर : अक्षर पटेल (Axar Patel) याने केलेल्या धमाकेदार कामगिरी करत न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs New Zealand 1st Test) टीम इंडियाने पुनरागमन केलं आहे. न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये 296 रन केले, त्यामुळे भारताला 49 रनची आघाडी मिळाली. कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये सुरू असलेल्या या मुकाबल्यात भारताने पहिल्या इनिंगमध्ये 345 रन केले होते. यानंतर न्यूझीलंडचे ओपनर टॉम लेथम (Tom Latham) आणि विल यंग (Will Young) यांच्याशिवाय कोणालाच मोठा स्कोअर करता आला नाही. लेथमने 95 आणि यंगने 89 रनची खेळी केली. भारताकडून अक्षर पटेलने 5 आणि आर.अश्विनने 3 विकेट घेतल्या. उमेश यादव (Umesh Yadav) आणि रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 1 विकेटवर 14 रन झाला होता. टीम इंडियाला दुसऱ्या इनिंगमध्ये शुभमन गिलच्या (Shubhaman Gill) रुपात पहिला धक्का बसला. काईल जेमिसनने (Kyle Jamieson) गिलला एक रनवर बोल्ड केलं. याचसह जेमिसनच्या टेस्ट क्रिकेटमध्ये 50 विकेट पूर्ण झाल्या. जेमिसन सगळ्यात कमी टेस्टमध्ये 50 विकेटचा टप्पा गाठणारा न्यूझीलंडचा बॉलर झाला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा 9 आणि मयंक अग्रवाल 4 रनवर खेळत आहेत. भारताकडे आता 63 रनची आघाडी आहे.

डावखुरा स्पिनर अक्षर पटेलच्या भेदक बॉलिंगमुळे न्यूझीलंडची बॅटिंग गडगडली, पण भारताला मॅचमध्ये पुनरागमन करण्याची संधी उमेश यादवने दिली. लंचच्या आधी उमेशने केन विलियमसनला स्वस्तात आऊट केलं. यानंतर अक्षर पटेलने रॉस टेलरला 11 रनवर, हेनरी निकोल्सला 2 रनवर आणि टॉम लेथमला 95 रनवर आऊट केलं. रविंद्र जडेजाने रचिन रविंद्रला 13 रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, ज्यामुळे न्यूझीलंडचा स्कोअर 197/1 वरुन 241/6 एवढा झाला. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारतीय बॉलर्सनी 52 रनमध्येच 4 विकेट घेतल्या.

First published: