मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ 1st Test : अश्विनचा वसीम अक्रमला धक्का, आता हरभजन सिंगला 'धोका'!

IND vs NZ 1st Test : अश्विनचा वसीम अक्रमला धक्का, आता हरभजन सिंगला 'धोका'!

भारताचा स्टार ऑफ स्पिनर आर.अश्विनने (R Ashwin) न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs New Zealand 1st Test) मोठं रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे.

  • Published by:  Shreyas

कानपूर, 27 नोव्हेंबर : भारताचा स्टार ऑफ स्पिनर आर.अश्विनने (R Ashwin) न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs New Zealand 1st Test) मोठं रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे. अश्विनने त्याच्या टेस्ट करियरमध्ये 416 विकेटचा टप्पा गाठला आहे. या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये अश्विनने 3 विकेट घेतल्या. आपल्या करियरच्या 80 व्या टेस्टच्या 149 व्या इनिंगमध्ये अश्विनच्या 416 विकेट पूर्ण झाल्या. याचसह अश्विनने पाकिस्तानचा दिग्गज फास्ट बॉलर वसीम अक्रम (Wasim Akram) याचा रेकॉर्ड मोडला आहे. अक्रमच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 414 विकेट आहेत. अश्विनचं लक्ष आता हरभजन सिंगचं (Harbhajan Singh) 417 विकेटचं रेकॉर्ड मोडण्यावर आहे. भारताकडून सर्वाधिक विकेट अनिल कुंबळेने (Anil Kumble) घेतल्या आहेत. कुंबळेच्या नावावर 619 विकेट आहेत. यानंतर कपिल देव यांनी 131 टेस्टमध्ये 434 विकेट मिळवल्या आहेत.

कानपूर टेस्टच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये 1 विकेट गमावून 14 रन केले. चेतेश्वर पुजारा 4 आणि मयंक अग्रवाल 1 रनवर खेळत आहे. भारताची आघाडी आता 63 रनची झाली आहे. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाने 345 रन केले होते, यानंतर न्यूझीलंडचा 296 रनवर ऑल आऊट झाला. अक्षर पटेलने 5 आणि अश्विनने 3 विकेट घेतल्या.

अश्विनने त्याच्या करियरमध्ये 111 वनडे आणि 51 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या, यात त्याने वनडेमध्ये 150 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 61 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय 135 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 655 विकेट आहेत. अश्विन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब आणि पुण्याकडून खेळला आहे.

First published:

Tags: New zealand, R ashwin, Team india