• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ : ...त्यासाठी शतक गरजेचं नाही, खराब फॉर्मच्या प्रश्नावर रहाणे संतापला

IND vs NZ : ...त्यासाठी शतक गरजेचं नाही, खराब फॉर्मच्या प्रश्नावर रहाणे संतापला

India vs New Zealand 1st Test अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) त्याच्या खराब फॉर्मविषयी विचारलेला प्रश्न आवडला नाही. माझ्या फॉर्मबाबत चिंता करणं गरजेचं नाही, तसंच टीमसाठी योगदान द्यायचा अर्थ प्रत्येक टेस्टमध्ये शतक करणं नाही, अशी प्रतिक्रिया रहाणेने दिली.

 • Share this:
  कानपूर, 24 नोव्हेंबर : अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) त्याच्या खराब फॉर्मविषयी विचारलेला प्रश्न आवडला नाही. माझ्या फॉर्मबाबत चिंता करणं गरजेचं नाही, तसंच टीमसाठी योगदान द्यायचा अर्थ प्रत्येक टेस्टमध्ये शतक करणं नाही, अशी प्रतिक्रिया रहाणेने दिली. रहाणेने यावर्षी खेळलेल्या 11 टेस्ट मॅचमध्ये 19 च्या सरासरीने रन केले आहेत. खेळाडूने जर 30, 40 किंवा 50 रन केले आणि टीमचा विजय झाला तरी ते महत्त्वाचे आहेत. माझं काम टीमसाठी जेवढं शक्य होईल तेवढं योगदान द्यायचं हे आहे, असं वक्तव्य रहाणेने केलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला 25 नोव्हेंबरपासून कानपूरमधून सुरूवात होणार आहे. कानपूर आणि मुंबईमध्ये होणाऱ्या टेस्टमध्ये रहाणेची कामगिरी निराशाजनक झाली तर त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी होणारी निवड कठीण होईल. भविष्याबाबतही रहाणेला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने भविष्यात काय होईल ते मला माहिती नाही, तसंच मी याबाबत चिंतेत नाही. भविष्यात जे होईल ते होईल, मला वर्तमानामध्ये राहणं गरजेचं आहे, त्यामुळे मी सर्वोत्तकृष्ट कामगिरी करू शकेन, असं रहाणे म्हणाला. 'जेव्हा मी बॅटिंगला जातो तेव्हा माझं लक्ष फक्त बॅटिंगवर असतं. बॅटिंग करत असताना मी त्याच क्षणात असतो. जेव्हा मी फिल्डिंग करत असतो, तेव्हा आपण काय रणनिती आखू शकतो ही असते,' असं रहाणेने सांगितलं. राहुल द्रविडने आम्हाला गोष्टी सोप्या ठेवायला आणि अजिबात चिंता न करायला सांगितल्याचंही रहाणे म्हणाला. केएल राहुलला दुखापत झाल्यामुळे श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संधी मिळेल, हे अजिंक्य रहाणेने स्पष्ट केलं. श्रेयस अय्यरची ही पहिलीच टेस्ट असेल. विराट कोहलीने (Virat Kohli) पहिल्या टेस्टमधून तर रोहित शर्माने (Rohit Sharma) टेस्ट सीरिजमधून विश्रांती घेतली आहे. तर केएल राहुलला (KL Rahul) दुखापत झाल्यामुळे तो सीरिजमधून बाहेर झाला आहे. राहुलऐवजी सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) टीममध्ये निवड करण्यात आली. यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या दोन मुंबईकरांमध्ये स्पर्धा होती. अखेर अजिंक्य रहाणे आणि राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) जोडीने श्रेयस अय्यरवर विश्वास दाखवला. श्रेयसनं आजवर 92 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 52.18 च्या सरासरीनं 4592 रन काढले आहेत. यामध्ये 12 शतक आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे.तर 202 हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे.
  Published by:Shreyas
  First published: