• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ 1st Test : रहाणे है तो मुमकिन है! टॉसआधीच 'फिक्स' झाला कानपूर टेस्टचा निकाल

IND vs NZ 1st Test : रहाणे है तो मुमकिन है! टॉसआधीच 'फिक्स' झाला कानपूर टेस्टचा निकाल

भारताने न्यूझीलंडचा टी-20 सीरिजमध्ये 3-0 ने पराभव केला, यानंतर आता दोन्ही टीममध्ये 2 टेस्ट मॅचची सीरिज (India vs New Zealand Test Series) होणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) गैरहजेरीत भारतीय टीमचं नेतृत्व अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane Captaincy Record) करणार आहे.

 • Share this:
  कानपूर, 24 नोव्हेंबर : भारताने न्यूझीलंडचा टी-20 सीरिजमध्ये 3-0 ने पराभव केला, यानंतर आता दोन्ही टीममध्ये 2 टेस्ट मॅचची सीरिज (India vs New Zealand Test Series) होणार आहे, या सीरिजचा पहिला सामना 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही टीमनी कंबर कसली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) गैरहजेरीत भारतीय टीमचं नेतृत्व अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane Captaincy Record) करणार आहे, तर उपकर्णधार चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) असेल. कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेने जो विक्रम केला आहे, तो इतर कोणत्याही भारतीयाला करता आला नाही, त्यामुळे रेकॉर्ड बघितलं तर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय होईल, हे निश्चित दिसत आहे. रहाणेने कोहलीच्या गैरहजेरीमध्ये 5 टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं, यातली एकही मॅच भारताने गमावली नाही, तर एक मॅच ड्रॉ झाली. रहाणे भारताचा एकमेव कर्णधार आहे, ज्याने 5 किंवा त्यापेक्षा जास्त टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं आणि एकही सामना गमावला नाही. रहाणे आपला अजेय रथ न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्येही पुढे नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करेल. रहाणेच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत पराभव केला. वर्षाच्या सुरुवातीला भारताने ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. ब्रिस्बेनच्या मैदानातला भारताचा हा पहिलाच टेस्ट विजय होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच मेलबर्न टेस्टमध्येही रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजय मिळवला होता. या टेस्टमध्ये रहाणेने शतक केलं होतं, तर सिडनीमधली टेस्ट भारताने ड्रॉ केली होती. रहाणेच्याच नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. 2017 साली विराट कोहलीला दुखापत झाली तेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला टेस्टमध्ये रहाणेने पहिल्यांदा भारताच्या टेस्ट टीमचं नेतृत्व केलं. या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला, सोबतच भारताने सीरिजही जिंकली. यानंतर 2018 साली अफगाणिस्तानविरुद्ध बँगलोरमध्ये झालेल्या टेस्टमध्येही अजिंक्यच टीमचा कर्णधार होता. रहाणेच्या आधी कृष्णमच्चारी श्रीकांत हे एकमेव कर्णधार होते ज्यांनी एकही सामना गमावला नाही. श्रीकांत यांनी 4 टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं, पण यातला एकही सामना भारताने जिंकला नाही, सगळ्या 4 टेस्ट ड्रॉ झाल्या होत्या. अजिंक्य रहाणेने तीन वनडे सामन्यांमध्येही टीम इंडियाचं नेतृत्व केलं. या तिन्ही सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला. तर दोन टी-20 पैकी एक सामना भारताने जिंकला आणि एक गमावला. कोहली सगळ्यात यशस्वी कॅप्टन विराट कोहली हा टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन आहे. कोहलीने आतापर्यंत 65 टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं, यातल्या 38 मॅच भारताने जिंकल्या आणि 16 मॅचमध्ये टीमला पराभवाचा सामना करावा लागला. विराटच्या नेतृत्वात 11 टेस्ट ड्रॉ झाल्या. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी (MS Dhoni) आहे. धोनीने 60 टेस्टमध्ये भारताचं नेतृत्व केलं, यातल्या 27 टेस्ट टीमने जिंकल्या आणि 18 हरल्या, तर 15 मॅच ड्रॉ झाल्या.
  Published by:Shreyas
  First published: