न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाचा 'फास्टर नेहरा'ला विजयी निरोप

टीम इंडियाने न्युझीलंडचा 53 धावांनी पराभव केलाय. या विजयसह टीमने आशिष नेहराला विजयी निरोप दिलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2017 02:23 AM IST

न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाचा 'फास्टर नेहरा'ला विजयी निरोप

01 नोव्हेंबर : वनडे सिरीज 2-1 ने जिंकल्यानंतर टीम इंडियाने टी-20 सामन्यातही न्यूझीलंडचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवलाय. टीम इंडियाने न्युझीलंडचा 53 धावांनी पराभव केलाय. या विजयसह टीमने आशिष नेहराला विजयी निरोप दिलाय.

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताने टाॅस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ओपनिंग जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवनने तडाखेबाज बॅटिंग करत दमदार सुरुवात केली. रोहित शर्माने 80 तर शिखरनेही 80 रन्स केले. यात रोहितने 6 चौकार आणि 4 षटकार लगावले. तर शिखरने 10 चौकार आणि 2 षटकाराने किवींच्या बाॅलर्सची धुलाई केली. कॅप्टन विराट कोहलीने 26 रन्स केले. भारताने किवींसमोर विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं.

203 धावांच्या पाठलाग करणाऱ्या किवींची धुळधाण उडाली. टाॅम लाॅथिनने सर्वाधिक 39 रन्स केले तर केन विलसनने 28 आणि मिचेल सनटेनरने 27 रन्स केले. या तिघांच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करत आली नाही. अवघा किवीचा संघ निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 149 रन्सवर गारद झाला.

भारताकडून अक्सर पटेल आणि चहलने प्रत्येकी 2 विकेट घेतल्यात. तर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पटेलने प्रत्येक एक-एक विकेट घेतल्यात. मात्र, आपल्या अखेरच्या सामन्यात आशिषनेहराला विकेट घेता आली नाही.

या सामन्यात आशिष नेहराने अखेरची ओव्हर टाकली पण त्याला  विकेट घेता आली नाही. नेहरा जेव्हा अखेरची ओव्हर टाकण्य़ासाठी आला तेव्हा स्टेडिअममध्ये भाऊक वातावरण निर्माण झालं होतं. त्याचा एक चाहता सुरक्षारक्षकांना बाजूला सारून मैदानावर आला आणि आपल्या लाडक्या खेळाडू नेहराच्या पाया पडला. अखेर भारतीय टीमकडून सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा खेळाडू म्हणून क्रिकेटला अलविदा केलं.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2017 10:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...