INDvsNZ 1st ODI : 347 धावा करूनही भारताचा पराभव, टेलरच्या खेळीने अय्यरचे शतक व्यर्थ

INDvsNZ 1st ODI : 347 धावा करूनही भारताचा पराभव, टेलरच्या खेळीने अय्यरचे शतक व्यर्थ

टी20 मध्ये 5-0 ने पराभूत झालेल्या न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतावर 4 गडी राखून विजय मिळवला.

  • Share this:

हॅमिल्टन, 05 फेब्रुवारी :  टी20 मध्ये 5-0 ने पराभूत झालेल्या न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतावर 4 गडी राखून विजय मिळवला. भारताने दिलेल्या 348 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीची जोडी बाद झाल्यानंतर रॉस टेलरने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. लॅथमच्या साथीने महत्वपूर्ण अशी शतकी भागिदारी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. मार्टिन गुप्टिल आणि हेन्री निकोलस यांनी सुरुवातीला सावध खेळी केली. पण शार्दुल ठाकूरने मार्टिन गुप्टिलला केदार जाधवकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्याच्यानंतर टॉम ब्लंडलला कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर केएल राहुलने यष्टीचित केलं.

न्यूझीलंडची अवस्था 20 षटकांत 2 बाद 110 अशी झाली होती.  त्यानंतर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असेलल्या हेन्री निकोलसला विराट कोहलीने धावबाद केलं. निकोलस बाद झाल्यानंतर रॉस टेलर आणि लॅथम यांनी डाव सावरला. दोघांनी 129 धावांची भागिदारी करत संघाला विजयाच्या समीप नेलं. मात्र, लॅथम कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 48 चेंडूत 69 धावा केल्या. रॉस टेलरने 73 चेंडूत शतक साजरं केलं.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरचे शतक आणि विराट, केएल राहुल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकांत 4 बाद 347 धावा केल्या. भारताची सलामीची जोडी लवकर बाद झाली. तरी विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर श्रेयस अय्यरने शतकी खेळी केली. त्याच्याशिवाय केएल राहुलनेही अर्धशतक केलं.

टीम इंडियाच्या डावाची सुरुवात पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी केली. वनडेमध्ये पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या दोघांनीही सावध सुरुवात केली. मात्र पृथ्वी शॉ 20 धावांवर बाद झाला. पृथ्वी शॉ पाठोपाठ मयंक अग्रवालही 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने डाव सावरला. दोघांनी शतकी भागिदारी करत संघाचे दीड शतक पूर्ण केलं. विराट कोहलीने 61 चेंडूत अर्धशतक साजरं केलं. विराट 51 धावांवर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यरने शतकी भागिदारी करत डाव सावरला.

जेम्स निशामने 17 व्या षटकात श्रेयस अय्यरला जीवगान दिलं. त्याचा लाभ अय्यरने उठवत शतक साजरं केल. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि केदार जाधव यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेतला. अय्यर बाद झाल्यानंतर राहुल आणि केदार जाधव यांनी 25 चेंडूतच 50 धावांची भागिदारी केली. केएल राहुल 88 धावांवर नाबाद राहिला तर केदार जाधव 26 धावांवर नाबाद राहिला.

पाहा VIDEO : सहकाऱ्याला बाद करण्यासाठी धावणारे वर्ल्ड कप जिंकायला निघालेत, पाकचे खेळाडू ट्रोल

भारताचा एकदिवसीय संघ - विराट कोहली, पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, केएल राहुल, मनिष पांडे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी.

न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ - टॉम लॅथम, मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, कुलिन डी ग्रँडहोम, जिमी निशाम, स्कॉट कुगलिन, टॉम ब्लंडेल, हेन्री निकोलस, मिशेल सँटनर, हॅमिश बॅनेट, इश सोधी, टिम साउदी, काइल जेमिसन, मार्क चॅपमॅन.

सेमीफायनलमध्ये यशस्वीचे शतक, मुंबईत वडिलांना दिलेलं वचन आफ्रिकेत केलं पूर्ण

First published: February 5, 2020, 9:40 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading