Home /News /sport /

IND vs ENG : ऋषभ पंत अखेर फॉर्ममध्ये, सराव सामन्यात आक्रमक खेळी

IND vs ENG : ऋषभ पंत अखेर फॉर्ममध्ये, सराव सामन्यात आक्रमक खेळी

टीम इंडियाचा (Team India) विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याला इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर सूर गवसला आहे. शुक्रवारी सराव सामन्यात पंतने आक्रमक बॅटिंग केली. लिस्टरशायरकडून खेळताना पंतने 76 रनची खेळी केली.

    मुंबई, 24 जून : टीम इंडियाचा (Team India) विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याला इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर सूर गवसला आहे. शुक्रवारी सराव सामन्यात पंतने आक्रमक बॅटिंग केली. लिस्टरशायरकडून खेळताना पंतने 76 रनची खेळी केली. पंतच्या या खेळीमुळे लिस्टरशायरला मॅचमध्ये पुनरागमन करता आलं. ऋषभ पंत नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये कर्णधार होता, पण त्याला बॅटने संघर्ष करावा लागला. सराव सामन्यातमध्ये पंत पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आला. पंत मैदानात उतरला तेव्हा लिस्टरशायरचा स्कोअर 71/4 एवढा होता, त्यामुळे टीमला पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पंतही लिस्टरशायरच्या अपेक्षेत खरा उतरला. टीम इंडियाच्या बॉलिंगची पंतने शाळा घेतली. 71 बॉलमध्ये अर्धशतक ऋषभ पंत सराव सामन्यात अर्धशतक करण्यात यशस्वी ठरला. 87 बॉलमध्ये 76 रन करून पंत आऊट झाला, यात त्याने 14 फोर आणि 1 सिक्स मारली. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांच्या बॉलिंगवर पंतने चांगले शॉट मारले. पंतला अखेर ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये पंत अजिबात फॉर्ममध्ये नव्हता. 4 मॅचमध्ये त्याला फक्त 58 रनच करता आले, यात त्याचा सर्वाधिक स्कोअर 29 रन होता. आयपीएल 2022 मध्येही पंत संघर्ष करताना दिसला. दिल्लीचा कॅप्टन असलेल्या पंतने 14 मॅचमध्ये फक्त 340 रन केले, यात त्याचा सर्वाधिक स्कोअर 44 रन होता. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर मात्र पंतने त्याचं जुनं रूप दाखवलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Rishabh pant

    पुढील बातम्या