मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs IRE : टीम इंडियाला सोपं जाणार नाही आयर्लंडचं आव्हान, असं आहे दोन्ही टीमचं रेकॉर्ड!

IND vs IRE : टीम इंडियाला सोपं जाणार नाही आयर्लंडचं आव्हान, असं आहे दोन्ही टीमचं रेकॉर्ड!

भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातल्या 2 टी-20 मॅचच्या सीरिजची (T20 Series) पहिली मॅच आज खेळवली जाणार आहे. मागच्या काही काळात टीम इंडियाची टी-20 क्रिकेटमधली कामगिरी उत्कृष्ट झाली आहे.

भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातल्या 2 टी-20 मॅचच्या सीरिजची (T20 Series) पहिली मॅच आज खेळवली जाणार आहे. मागच्या काही काळात टीम इंडियाची टी-20 क्रिकेटमधली कामगिरी उत्कृष्ट झाली आहे.

भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातल्या 2 टी-20 मॅचच्या सीरिजची (T20 Series) पहिली मॅच आज खेळवली जाणार आहे. मागच्या काही काळात टीम इंडियाची टी-20 क्रिकेटमधली कामगिरी उत्कृष्ट झाली आहे.

मुंबई, 26 जून : भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातल्या 2 टी-20 मॅचच्या सीरिजची (T20 Series) पहिली मॅच आज खेळवली जाणार आहे. मागच्या काही काळात टीम इंडियाची टी-20 क्रिकेटमधली कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. या सीरिजमध्येही हाच फॉर्म कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया इच्छुक असेल. नुकतीच झालेली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 सीरिजही 2-2 ने बरोबरीत साधण्यात टीम इंडियाला यश आलं होतं. मुख्य म्हणजे या सीरिजमध्ये टीम इंडिया 0-2 ने पिछाडीवर होती.

भारत आणि आयर्लंड यांच्या मागच्या 5-5 मॅचचा निकाल बघितला तर आयर्लंड भारतापेक्षा पुढे आहे. आयर्लंडने मागच्या 5 पैकी 3 मॅच जिंकल्या आणि 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर दुसरीकडे भारताने 2 मॅच जिंकल्या आणि 2 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला, तर एका मॅचचा निकाल लागला नाही. पण भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या मॅचचे आकडे बघितले तर आयर्लंडला भारताविरुद्ध एकही मॅच जिंकता आलेली नाही.

टी-20 मध्ये भारत

भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत 3 टी-20 मॅच झाल्या, या सगळ्या मॅच टीम इंडियाने जिंकल्या. या दोन्ही टीममध्ये पहिली टी-20 मॅच 2009 साली नॉटिंघममध्ये झाली, या सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेटने विजय झाला. तर 2018 साली आयर्लंडच्या जमिनीवरच भारताने 2 टी-20 सामन्यांमध्ये 76 आणि 143 रनने विजय मिळवला.

वनडेमध्ये टीम इंडिया

वनडे क्रिकेटमध्येही भारताचं आयर्लंडविरुद्धचं रेकॉर्ड दमदार आहे. दोन्ही टीममध्ये आतापर्यंत 3 वनडे मॅच झाल्या आहेत, या तिन्ही मॅच भारताने जिंकल्या. टीम इंडियाने आयर्लंडविरुद्धची पहिली वनडे 2007 साली बेलफास्टमध्ये झाली, या सामन्यात भारताचा 9 विकेटने विजय झाला. 2011 साली बँगलोरमध्ये या दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध पुढे ठाकल्या, या सामन्यात भारताचा 6 विकेटने विजय झाला. दोन्ही टीममध्ये तिसरी वनडे 2015 साली हॅमिल्टनमध्ये झाली. या मॅचमध्ये टीम इंडियाचा 8 विकेटने विजय झाला.

आयर्लंडविरुद्ध आतापर्यंत झालेल्या सगळ्या 6 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे, त्यामुळे पहिली मॅच जिंकण्याच्या उद्देशाने आयर्लंडची टीम मैदानात उतरेल. या सीरिजसाठी हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार आहे.

भारतीय टीम

ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, इशान किशन, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, रवी बिष्णोई, युझवेंद्र चहल

First published:

Tags: T20 cricket, Team india