मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs IRE : Shikhar Dhawan भारताच्या B टीमसाठीही लायक नाही! द्रविडने फोन करून सांगितलं रिजेक्शनचं कारण

IND vs IRE : Shikhar Dhawan भारताच्या B टीमसाठीही लायक नाही! द्रविडने फोन करून सांगितलं रिजेक्शनचं कारण

टीम इंडियाचा विस्फोटक ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) मागच्या एका वर्षापासून टीममधून बाहेर आहे. भारतात सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्येही धवनला संधी देण्यात आली नाही. धवनची टीम इंडियात निवड न झाल्यामुळे टीम इंडियाचा मुख्य कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) त्याला फोन केला होता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 16 जून : टीम इंडियाचा विस्फोटक ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) मागच्या एका वर्षापासून टीममधून बाहेर आहे. भारतात सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्येही धवनला संधी देण्यात आली नाही. यानंतर आयर्लंडविरुद्धच्या (India vs Ireland) 2 टी-20 मॅचच्या सीरिजसाठीही धवनची टीम इंडियात निवड झालेली नाही. आयर्लंड दौऱ्यावेळीच टीम इंडियाचे सीनियर खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत, त्यामुळे आयर्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी बी टीमची निवड करण्यात आली, पण या टीममध्येही शिखर धवनला स्थान देण्यात आलं नाही.

आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने (BCCI) बुधवारी 17 सदस्यीय टीमची घोषणा केली. या टीममध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनचं कमबॅक झालं आहे, तर आयपीएलमध्ये धमाका करणाऱ्या राहुल त्रिपाठीची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली आहे.

दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये जेव्हा धवनची निवड झाली नव्हती, तेव्हा टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडने त्याला फोन करून टीममध्ये न निवडण्याचं कारण सांगितलं होतं. टी-20 क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंना संधी द्यायचा आमचा विचार आहे, असं द्रविडने धवनला फोन करून सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच कारणामुळे धवनची आयर्लंड दौऱ्यासाठीही निवड झालेली नाही.

मागच्या वर्षी धवन कर्णधार

शिखर धवनने शेवटची टी-20 मॅच कर्णधार म्हणून खेळली होती. श्रीलंका दौऱ्यात वनडे आणि टी-20 सीरिजसाठी धवनला कर्णधार करण्यात आलं होतं, कारण तेव्हाही टीम इंडियाचे सीनियर खेळाडू इंग्लंड दौऱ्यावरच होते. श्रीलंका सीरिजनंतर मात्र धवन टीम इंडियातून बाहेर झाला.

आयपीएल 2022 मध्ये पंजाबकडून खेळताना शिखर धवनने चांगली कामगिरी केली होती. या मोसमातल्या 14 सामन्यांमध्ये त्याने 460 रन केले. 2016 आयपीएलपासून धवन प्रत्येक मोसमात 400 पेक्षा जास्त रन करत आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया

हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

First published:

Tags: Rahul dravid, Shikhar dhawan, Team india