Home /News /sport /

T20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाच किंग, ऑस्ट्रेलियाला मागे टाकत केला वर्ल्ड रेकॉर्ड!

T20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाच किंग, ऑस्ट्रेलियाला मागे टाकत केला वर्ल्ड रेकॉर्ड!

टीम इंडिया क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. टीम इंडियाने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात (India vs Ireland) विजयी सुरूवात केली.

    मुंबई, 27 जून : टीम इंडिया क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. टीम इंडियाने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात (India vs Ireland) विजयी सुरूवात केली. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात झालेल्या पहिल्या मॅचमध्ये भारताने आयर्लंडवर 16 बॉल आणि 7 विकेट शिल्लक ठेवून विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 12-12 ओव्हरचाच झाला. पहिल्या टी-20 मॅचचा हिरो लेग स्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) होता. भारताचे अन्य बॉलर आयर्लंडच्या बॅट्समनसमोर संघर्ष करत होते, तिकडे चहलने उत्कृष्ट बॉलिंग केली. त्याने 3 ओव्हरमध्ये फक्त 11 रन देऊन 1 विकेट मिळवली. चहलच्या या बॉलिंगमुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. आयर्लंडला पहिल्या टी-20 सामन्यात हरवून टीम इंडियाच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डही झाला आहे. भारतीय टीम टी-20 क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक विजय मिळवणारी टीम ठरली आहे. या रेकॉर्डमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकलं आहे. ऑस्ट्रेलियन टीमने टी-20 क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना 94 मॅच खेळल्या, यातल्या 54 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला, तर 37 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. भारतीय टीमने आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडविरुद्ध 75 वा सामना खेळला, यातला 55वा सामना जिंकण्यात त्यांना यश आलं, तर 19 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. टी-20 आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक विजय टीम इंडिया : 75 सामन्यांमध्ये 55 विजय आणि 19 पराभव ऑस्ट्रेलिया : 94 मॅचमध्ये 54 विजय आणि 37 पराभव
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india

    पुढील बातम्या