Home /News /sport /

IND vs IRE 1st T20 : हार्दिकने टॉस जिंकला, जम्मू एक्सप्रेस उमरानचं पदार्पण!

IND vs IRE 1st T20 : हार्दिकने टॉस जिंकला, जम्मू एक्सप्रेस उमरानचं पदार्पण!

Photo-BCCI

Photo-BCCI

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा (India vs Ireland) कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याचा टीम इंडियाचा कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना आहे.

    मुंबई, 26 जून : आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा (India vs Ireland) कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याचा टीम इंडियाचा कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना आहे. हार्दिकच्या नेतृत्वात आपली पहिलीच आयपीएल खेळणारी गुजरात टायटन्स चॅम्पियन झाली होती. टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेल्यामुळे आयर्लंड दौऱ्यासाठी युवा खेळाडूंची निवड झाली, या खेळाडूंचं नेतृत्व हार्दिकला देण्यात आलं. या सामन्यातून उमरान मलिक (Umran Malik) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. उमरान मलिक यानेही आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळताना धमाका केला होता. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मधून सूर्यकुमार यादवचं कमबॅक झालं आहे. दुखापतीमुळे सूर्या आयपीएलचे काही सामने आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज खेळू शकला नव्हता. संजू सॅमसनला मात्र प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही, त्याच्याऐवजी दीपक हुड्डाला खेळवण्यात येत आहे. Live Score पाहण्यासाठी क्लिक करा भारतीय टीम ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, उमरान मलिक भारताचं रेकॉर्ड भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत 3 टी-20 मॅच झाल्या, या सगळ्या मॅच टीम इंडियाने जिंकल्या. या दोन्ही टीममध्ये पहिली टी-20 मॅच 2009 साली नॉटिंघममध्ये झाली, या सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेटने विजय झाला. तर 2018 साली आयर्लंडच्या जमिनीवरच भारताने 2 टी-20 सामन्यांमध्ये 76 आणि 143 रनने विजय मिळवला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india

    पुढील बातम्या