• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Men Will be Men! या एका PHOTO मुळे ऋद्धीमान साहा आला अडचणीत

Men Will be Men! या एका PHOTO मुळे ऋद्धीमान साहा आला अडचणीत

कोरोना लस घ्यायला गेलेला ऋद्धीमान साहा झाला ट्रोल

कोरोना लस घ्यायला गेलेला ऋद्धीमान साहा झाला ट्रोल

टीम इंडियाचा विकेट कीपर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याने इंग्लंडमध्ये (India tour of England) कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. याचा फोटो ऋद्धीमान साहाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, पण या फोटोमुळे त्याच्यावर ट्रोल व्हायची वेळ आली आहे.

 • Share this:
  लंडन, 20 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर (India vs England) आहे. पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय झाला. यानंतर आता तिसरी टेस्ट 25 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टच्या मध्ये 8 दिवस असल्यामुळे खेळाडूंनाही आराम करण्याची संधी उपलब्ध आहे. पण टीम इंडियाचा विकेट कीपर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याने इंग्लंडमध्ये कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. याचा फोटो ऋद्धीमान साहाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, पण या फोटोमुळे त्याच्यावर ट्रोल व्हायची वेळ आली आहे. कोरोनाची लस घेताना ऋद्धीमान साहा लस देणाऱ्या महिला कर्मचाऱ्याकडे बघत आहे, याच फोटोवरून त्याच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. अनेकांनी तर मेन विल बी मेन, अशी कमेंटही साहाच्या या फोटोवर केली आहे. ऋद्धीमान साहा इंग्लंड दौऱ्यावर गेला असला तरी त्याला अजून खेळण्याची संधी मिळालेली नाही. ऋषभ पंतचा फॉर्म बघता त्याला उरलेल्या तीन टेस्टमध्येही खेळण्याची संधी मिळणं जवळपास अशक्य आहे. इंग्लंड दौरा संपल्यानंतर खेळाडू थेट आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी युएईला रवाना होणार आहेत. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी खेळाडूंनी कोरोना लसीचा पहिला डोस भारतात घेतला होता. इंग्लंडमध्ये दुसरा डोस सहज उपलब्ध होईल म्हणून बीसीसीआयने खेळाडूंना कोव्हिशिल्ड लस घ्यायला सांगितली होती. आयपीएलआधी सगळे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्याचे आदेश बीसीसीआयने आयपीएल फ्रॅन्चायजींना दिले आहेत.
  Published by:Shreyas
  First published: