• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : श्रीलंकेत असणारे पृथ्वी-सूर्या इंग्लंडला जाणार का नाही? जाणून घ्या

IND vs ENG : श्रीलंकेत असणारे पृथ्वी-सूर्या इंग्लंडला जाणार का नाही? जाणून घ्या

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली, पण हे दोन्ही खेळाडू इंग्लंडला रवाना होणार का नाही याबाबत अजूनही साशंकता आहे.

 • Share this:
  कोलंबो, 31 जुलै : पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. इंग्लंडमध्ये असलेले शुभमन गिल (Shubhaman Gill), आवेश खान (Avesh Khan) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांना दुखापत झाल्यामुळे ते टेस्ट सीरिज खेळू शकणार नाहीत, त्यामुळे पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल श्रीलंकेहून थेट इंग्लंडला रवाना होणार होते. पण श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आधी कृणाल पांड्याची (Krunal Pandya) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह टीम इंडियाचे 8 खेळाडू कृणालच्या संपर्कात आले, त्यामुळे सगळ्यांना आयसोलेट करण्यात आलं. पृथ्वी आणि सूर्यकुमार आयसोलेट झाल्यामुळे ते इंग्लंडला जाणार का नाहीत? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. या दोघांच्या इंग्लंडला रवाना होण्याबाबत बीसीसीआयने (BCCI) महत्त्वाची माहिती दिली आहे. शनिवारी सकाळी या दोघांची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली, याचे रिपोर्ट आल्या नंतरच दोघं इंग्लंडला जाणार का नाही, याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त इनसाईड स्पोर्ट्सने दिलं आहे. कृणाल पांड्याची (Krunal Pandya) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांच्या टेस्ट करण्यात आल्या. या टेस्टमध्ये युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham) यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे हे तिघं आणि पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव अजूनही इंग्लंडमध्येच आहेत. 'सध्या आम्ही सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत. याबाबत सध्या तरी काही सांगू शकत नाही. श्रीलंका सीरिजनंतर दोघांना लगेच इंग्लंडला पाठवण्यात येणार होतं, त्यामुळे ते दुसऱ्या टेस्टपासून टीम इंडियात सामील होऊ शकले असते. आता त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह येईल एवढीच अपेक्षा. जर त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यांच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूंना इंग्लंडला पाठवण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नसेल,' अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. 'बदली खेळाडू म्हणून कोणाला पाठवायचं याचा निर्णय निवड समिती घेईल. कोरोना काळात नेहमीच बॅक अप प्लान तयार असतो. पुढच्या दोन दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल,' असं सूत्रांनी सांगितलं. शनिवारी या दोघांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तर दोन्ही खेळाडू 31 ला रात्री किंवा 1 ऑगस्टला इंग्लंडसाठी रवाना होतील, असं सांगण्यात येत आहे. इंग्लंडला रवाना झाल्यानंतर दोन्ही खेळाडू लंडनमध्ये 10 दिवस क्वारंटाईन होतील. 10 दिवस क्वारंटाईन झाल्यामुळे दोघंही पहिल्या टेस्टमध्ये खेळू शकणार नाहीत.
  Published by:Shreyas
  First published: