मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: 'बार मे आर्मी का बार्मी आर्मी?', विराटवर निशाणा साधल्याने जाफरचं चोख प्रत्युत्तर

IND vs ENG: 'बार मे आर्मी का बार्मी आर्मी?', विराटवर निशाणा साधल्याने जाफरचं चोख प्रत्युत्तर

भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) हा कायमच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. टीम इंडियाच्या एखाद्या खेळाडूला कोणी छेडलं तर त्याला प्रत्युत्तर द्यायला वसीम जाफर मागे पुढे पाहत नाही.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 25 जुलै: भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) हा कायमच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. टीम इंडियाच्या एखाद्या खेळाडूला कोणी छेडलं तर त्याला प्रत्युत्तर द्यायला वसीम जाफर मागे पुढे पाहत नाही. इंग्लंड क्रिकेट टीमची सपोर्टर बार्मी आर्मीनेही (Barmy Army) अशाच प्रकारे विराट कोहलीवर (Virat Kohli) निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. बार्मी आर्मीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून जाफर आणि विराट कोहलीचा एक जुना फोटो शेयर केला. या फोटोमध्ये विराटच्या हातात धनुष्य बाण आहे. विराट कोहली इंग्लंड सीरिजमधून बाहेर, कारण तो टोकयोमध्ये तिरंदाजीची तयारी करत आहे, असं कॅप्शन बार्मी आर्मीने या फोटोला दिलं.

विराट कोहलीवर निशाणा साधल्यानंतर वसीम जाफरने बार्मी आर्मीला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. बार्मी आर्मी का बार आर्मी? असा सवाल जाफरने विचारला. यासोबत जाफरने गँग्स ऑफ वासेपूरचं एक मीमही शेयर केलं. जाफरच्या या ट्वीटनंतर चाहत्यांनीही बार्मी आर्मीला ट्रोल करायला सुरुवात केली.

wasim jaffer, barmy army, virat kohli, cricket news

1995 साली बार्मी आर्मीची स्थापना

बार्मी आर्मी इंग्लंड क्रिकेट टीमच्या समर्थकांचा एक ग्रुप आहे. इंग्लिश टीम जिकडे खेळायला जाते, तिकडे बार्मी आर्मीचे सदस्य इंग्लंड टीमला पाठिंबा द्यायला जातात. 1994-95 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी बार्मी आर्मीची स्थापना करण्यात आली होती. आता बार्मी आर्मीने स्वत:ला इंग्लंडमध्ये नोंदणीकृतही केलं आहे.

भारताला 2007 नंतर इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकता आली नाही. आता भारत-इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 2007 नंतर भारताने इंग्लंडमध्ये तीन टेस्ट सीरिज खेळल्या. 2011 साली टीम इंडियाचा 4-0 ने, यानंतर 2014 साली 3-1 ने आणि 2018 साली 4-1 ने पराभव झाला होता.

First published:

Tags: Cricket, India vs england, Virat kohli