मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : 'भारताने मॅच हरली तरी चालेल, पण...' हे काय बोलला सेहवाग?

IND vs ENG : 'भारताने मॅच हरली तरी चालेल, पण...' हे काय बोलला सेहवाग?

सुरक्षेतील चूक पाहून सेहवाग भडकला

सुरक्षेतील चूक पाहून सेहवाग भडकला

टीम इंडियाचा ओपनर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) मैदानात न घाबरता आक्रमक बॅटिंग करायचा. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता क्रिकेट एक्सपर्ट म्हणूनही सेहवाग आपली मतं तशाच पद्धतीने मांडतो. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या पाचव्या दिवसाआधीही सेहवागने टीम इंडियाला सल्ला दिला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

नॉटिंघम, 8 ऑगस्ट : टीम इंडियाचा ओपनर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) मैदानात न घाबरता आक्रमक बॅटिंग करायचा. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता क्रिकेट एक्सपर्ट म्हणूनही सेहवाग आपली मतं तशाच पद्धतीने मांडतो. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या पाचव्या दिवसाआधीही सेहवागने टीम इंडियाला सल्ला दिला आहे. या टेस्टच्या अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 157 रनची गरज आहे आणि टीमच्या हातात 9 विकेट आहेत. नॉटिंघमचं हवामान खराब असल्यामुळे पाचव्या दिवसाचा खेळ लंचनंतरही सुरू झाला नाही.

नॉटिंघममध्ये भारताने विजय मिळवण्यासाठी जावं, यामध्ये टीमचा पराभव झाला तरी चालेल, असं सेहवाग म्हणाला आहे. 'भारताला 50 ओव्हरमध्ये 157 रनचं आव्हान मिळालं, तरी प्रत्येक ओव्हरला 3 रन करण्याचा प्रयत्न टीमने करावा. 30 ओव्हरमध्ये हे आव्हान पार करणं थोडं कठीण आहे, कारण विकेट गेल्या तर टीमवर दबाव येईल. 157 रनचा पाठलाग करताना पराभव झाला तरी चालेल, कारण सीरिज मोठी आहे. पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाला तर टीम इंडियापुढे विजय मिळवण्यासाठी आणखी 4 संधी उपलब्ध आहेत,' असं सेहवाग म्हणाला.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानेही सीरिज सुरू व्हायच्या आधी आम्ही विजय मिळवण्यासाठी जाऊ, यामध्ये टीमचा पराभव झाला तरी चालेल, असं वक्तव्य केलं होतं.

नॉटिंघम टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहने घातक बॉलिंग केली. पहिल्या इनिंगमध्ये 4 विकेट घेणाऱ्या बुमराहने दुसऱ्या इनिंगमध्ये 5 विकेट मिळवल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा 303 रनवर ऑल आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये 95 रनची आघाडी मिळाल्यामुळे भारताला विजयासाठी 209 रनचं आव्हान मिळालं. चौथ्या दिवशी भारताने 52 रनवर 1 विकेट गमावली. केएल राहुल 26 रनवर आऊट झाला. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी 12-12 रनवर खेळत आहेत.

First published:

Tags: Cricket, India vs england, Virender sehwag