मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : सातव्या स्टम्पवरचा बॉल मारण्याची गरज काय? कोहलीच्या खराब शॉटचा VIDEO

IND vs ENG : सातव्या स्टम्पवरचा बॉल मारण्याची गरज काय? कोहलीच्या खराब शॉटचा VIDEO

विराट कोहलीने खेळला खराब शॉट

विराट कोहलीने खेळला खराब शॉट

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म सुरूच आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही (India vs England 2nd Test) विराट लवकर आऊट झाला, पण विराट कोहलीने खेळलेल्या खराब शॉटवर टीका होत आहे.

    लंडन, 15 ऑगस्ट : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म सुरूच आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही (India vs England 2nd Test) विराट लवकर आऊट झाला, पण विराट कोहलीने खेळलेल्या खराब शॉटवर टीका होत आहे. 31 बॉलमध्ये 20 रन करून विराट आऊट झाला. विराटच्या या खेळीमध्ये 4 फोरचा समावेश होता. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) लवकर आऊट झाल्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला, यानंतर त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक बॅटिंग केली. 24 व्या ओव्हरमध्ये सॅम करनने (Sam Curran) ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेल्या बॉलवर विराट कोहली शॉट खेळायला गेला, पण बॅटच्या एजला बॉल लागून विकेट कीपर जॉस बटलरच्या (Jos Butller) हातात बॉल गेला. सॅम करनने सातव्या स्टम्पवर टाकलेला बॉल खेळण्याची विराटला गरज होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बऱ्याच काळापासून विराट कोहली ऑफ स्टम्प बाहेरच्या बॉलवर ड्राईव्ह मारण्याच्या नादात विकेट कीपर किंवा स्लिपमध्ये कॅच देऊन आऊट होत आहे, तरीही विराट तिच चूक पुन्हा करताना दिसत आहे. गेल्या काही काळापासून विराट कोहलीला मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं आहे. मागच्या दोन वर्षात विराट कोहलीला एकही शतक करता आलेलं नाही, त्यामुळे विराटवरचा दबावही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Virat kohli

    पुढील बातम्या