मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : पुजारा-रहाणेच्या आड लपली विराटची कामगिरी! 2 वर्षातले धक्कादायक आकडे

IND vs ENG : पुजारा-रहाणेच्या आड लपली विराटची कामगिरी! 2 वर्षातले धक्कादायक आकडे

21 महिन्यांपासून विराटचा संघर्ष

21 महिन्यांपासून विराटचा संघर्ष

गेल्या काही काळापासून टीम इंडियाची मधली फळी टेस्ट क्रिकेटमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या खराब फॉर्ममुळे त्यांना टीममधून बाहेर काढण्याची मागणीही केली जाते. पण या दोघांच्या खराब फॉर्ममागे विराटची (Virat Kohli) कामगिरीही दडलेली आहे.

पुढे वाचा ...

लंडन, 16 ऑगस्ट : गेल्या काही काळापासून टीम इंडियाची मधली फळी टेस्ट क्रिकेटमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या खराब फॉर्ममुळे त्यांना टीममधून बाहेर काढण्याची मागणीही केली जात होती, पण लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये या दोघांनी शतकी पार्टनरशीप करत भारताला अडचणीतून बाहेर काढलं, यामुळे त्यांचं टीममधलं स्थानही वाचलं. पण या दोघांच्या खराब फॉर्ममागे विराटची (Virat Kohli) कामगिरीही दडलेली आहे. मागच्या 21 महिन्यांपासून विराटची बॅट शांत आहे. या दरम्यान टेस्ट, वनडे आणि टी-20 च्या एकूण 49 इनिंगमध्ये विराटला एकही शतक करता आलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही विराटला मोठी खेळी करता आली नाही.

विराटने दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 42 रन तर दुसऱ्या इनिंगमध्ये 20 रन केले. कोहलीने अखेरचं शतक 23 नोव्हेंबर 2019 साली बांगलादेशविरुद्ध केलं होतं. यानंतर 21 महिने झाले तरी त्याला एकही शतक करता आलं नाही. या कालावधीत पाकिस्तानच्या बाबर आझमने 7 शतकं केली.

विराट कोहलीने मागच्या 10 टेस्टच्या 17 इनिंगमध्ये विराटला फक्त 3 अर्धशतकं करता आली आहेत. 74 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. या काळात 24 च्या सरासरीने विराटला 407 रन करता आल्या. वनडेच्या 15 इनिंगमध्ये विराटने 8 अर्धशतकं करत 43 च्या सरासरीने 649 रन केले, यात त्याचा सर्वाधिक स्कोअर 89 रन होता. तर टी-20 मध्ये विराटने 17 इनिंगमध्ये 64 च्या सरासरीने 709 रन केले, यात 6 अर्धशतकं आहेत, तसंच त्याचा सर्वाधिक स्कोअर नाबाद 94 रन होता.

या तिन्ही फॉरमॅटमध्ये विराटने 49 इनिंग खेळून 41 च्या सरासरीने 1,765 रन केले आणि 17 अर्धशतकं ठोकली. त्याआधी विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 438 इनिंग खेळून 57 च्या सरासरीने 21,172 रन केले आणि 70 शतकं मारली. मागच्या काळात विराटची सरासरी 57 पासून घटून 41 पर्यंत खाली आली आहे.

टीमची कामगिरीही ढासळली

विराट कोहलीच्या खराब कामगिरीचा परिणाम टीमच्या निकालावरही झाला आहे. विराटने यादरम्यान 10 मॅचमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं, यातल्या 5 मॅचमध्ये टीमचा पराभव झाला तर 3 मॅच जिंकता आल्या, म्हणजेच टीमने 50 टक्के मॅच गमावल्या. या दरम्यान 19 इनिंगपैकी 6 मध्ये टीम इंडियाला 200 रनचा आकडाही गाठता आला नाही. कोहली मधल्या फळीमध्ये बॅटिंग करत असल्यामुळए टीमला सांभाळून घेतो, पण त्याच्या लवकर आऊट होण्यामुळे टीमला मोठा स्कोअर करण्यातही अपयश येत आहे.

भारताला करता आले नाहीत 400 रन

विराटने अखेरचं शतक नोव्हेंबर 2019 साली लगावलं होतं. यानंतरच्या 19 इनिंगमध्ये भारताला 400 रनही गाठता आले नाहीत. 365 रन टीमचा सर्वाधिक स्कोअर आहे. मार्च 2021 साली अहमदाबादमध्ये टीमने हा स्कोअर केला होता.

विराट कोहलीचं वनडेमधलं रेकॉर्डही दमदार आहे, पण शतक होत नसल्यामुळे टीमची कामगिरी खराब होत आहे. 15 वनडेपैकी फक्त 7 मध्ये टीमचा विजय झाला आणि 8 मॅच गमवाव्या लागल्या. टी-20 मध्ये मात्र टीमची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. या काळात भारताने 13 टी-20 जिंकल्या आणि फक्त 4 गमावल्या.

First published:
top videos

    Tags: India vs england, Virat kohli