इंग्लंड, 18 ऑगस्ट : शनिवारी खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आदिल रशिदने विराटला बाद करून भारताला पाचवा झटका दिला. 97 धावांवर विराटने लगावेलेल्या फटक्यावर बेन स्टोक्सने त्याचा झेल घेतला आणि त्याला शतक पूर्ण होण्याआधीच पॅव्हिलियनमध्ये पाठवले. 152 चेंडूंचा सामना करत त्याने 11 चौकार लगावले. भारताच्या संघाने 76 षटकांमध्ये 5 गडी गमावून 279 धावा काढल्या. त्यात राहणेने 131 चेंडूंचा सामना करत 12 चौकार लगावत 81 धावा काढल्या. चवथी विकेट पडल्यानंतर राहणेने विराटसोबत 159 धावांची भागिदारी केली डाव सावरला. 67 षटकांत भारताच्या ४ बाद 241 धावा झाल्या होत्या. अखेरिस पहल्या दिवशीच्या सामन्यात भारताने 6 बाद 307 धावा काढल्या.
यापूर्वी भारताला ४ झटके बसले आहेत. शिखर धवन, केएल राहूल, अजिंक्य राहणे आणि पुजारा पॅव्हिलीयनमध्य परतले असून, इंग्लिश कॅप्टन जो रूट ने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. या खेळात भारताने दिनेश कार्तिकच्या एवजी युवी बॉलर रिषभ पंत याला चान्स दिला. याव्यतिरिक्त या खेळात आणखी दोन प्रमुख बदल करण्यात करण्यात आले आहेत. दुसऱ्या टेस्टमध्ये खेळलेला स्पिनर कुलदीप यादव याला बाहेर पडावे लागले आहे, तर त्याच्या स्थानी जसप्रीत बुमराह याला संधी देण्यात आली आहे. दुखापत झाल्यामुळे आधीच्या दोन टेस्ट मैचमध्ये बुमराह बाहर होता. तसेच मुरली विजय एवजी शिखर धवन याला अंतिम-11 मध्ये संधी स्थान मिळाले आहे.
पांच मॅच सीरीजच्या पहल्या दोन मॅचमध्ये 'विराट सेने'ने निराशाजनक प्रदर्शन केलंय. त्यामुळे भारताचा संघ 2-0 ने पिछाडीवर आहे. भारतीय संघाला पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये एजबेस्टनमध्ये 31 धावांनी, तर लॉर्ड्समध्ये 159 धावांनी हार मानावी लागली होती. ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात भारतीय संघाला ही सावरण्याची शेवटची संधी राहणार आहे.
ट्रेंट ब्रिजचा सामना संपेपर्यंत भारताने 6 विकेटवर 307 धावा बनविल्या. विराट कोहली ने 97 धावा, अजिंक्य रहाणेने 81 धावा, शिखर धवनने 35, केएल राहुल ने 23 धावा काढत शेवटचे षटक खेळले. तर रिषभ पंत 22 धावांवर नाबाद राहिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 5 वा झटका, Cricket match, Hits century, Ind vs eng, Trent Bridge, Virat kohli, ट्रेंट ब्रिज, भारत, विराट कोहली, शतक हुकलं, सामना