नॉटिंघम, 3 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया (India vs England) कोणाला संधी देणार, याचं गुपित अजूनही कायम आहे. मंगळवारी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्येही विराटने याचं उत्तर दिलं नाही. टीम इंडियामध्ये कोणत्या 11 खेळाडूंना संधी मिळणार ते टॉसनंतरच सांगू, असं म्हणत सस्पेन्स कायम ठेवला. भारतीय टीम गेल्या काही सीरिजपासून मॅचच्या एक दिवस आधीच अंतिम-11 खेळाडूंची घोषणा करत होती. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही टीमची घोषणा आधीच करण्यात आली होती, पण आता भारतीय टीमने त्यांची रणनिती बदलली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर (WTC Final) शुभमन गिल (Shubhaman Gill) दुखापतग्रस्त झाला, तर सरावादरम्यान मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) डोक्याला बॉल लागला, त्यामुळे तो पहिल्या टेस्टमधून बाहेर झाला आहे. असं असलं तरी कर्णधार विराट कोहलीने ओपनिंग चिंतेचा विषय नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
शार्दुल खेळणार पहिली टेस्ट?
पत्रकार परिषदेत विराट कोहलीने शार्दुल ठाकूरची (Shardul Thakur) टीममध्ये निवड होईल, असे संकेत दिले. शार्दुल बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्येही योगदान देतो. तो फक्त इंग्लंड सीरिजसाठीच नाही, तर आमच्या भविष्यातल्या योजनेतही महत्त्वाचा भाग आहे, असं विराट कोहली म्हणाला.
'यावेळी आम्ही जास्त तयारीने मैदानात उतरणार आहोत. इंग्लंडमध्ये आम्ही वेळ घालवला, त्यामुळे इथली परिस्थितीमध्ये ढळून जाण्यात आम्हाला मदत मिळाली. ही तयारी आता मैदानात दाखवण्याची गरज आहे. प्रत्येक आंतरराष्ट्रीय सीरिज माझ्यासाठी आव्हानात्मक असते. कोणतीच सीरिज जास्त महत्त्वाची अथवा कमी महत्त्वाची नसते,' असं वक्तव्य विराटने केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Virat kohli