मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : खराब फॉर्ममधला विराट अनुष्कासोबत रामाच्या दरबारात, Photo Viral

IND vs ENG : खराब फॉर्ममधला विराट अनुष्कासोबत रामाच्या दरबारात, Photo Viral

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या करियरच्या सगळ्यात वाईट काळातून जात आहे. विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) भजन-किर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

लंडन, 16 जुलै : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या करियरच्या सगळ्यात वाईट काळातून जात आहे. कपिल देव (Kapil Dev) यांच्यासह अनेक दिग्गजांनी विराटऐवजी युवा खेळाडूला संधी द्यायची मागणी केली आहे. विराट कोहली सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंड दौऱ्यातल्या (India vs England) 5 इनिंगमध्ये विराटला एकदाही 20 पेक्षा अधिकचा स्कोअर करता आलेला नाही. त्यातच आता विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) भजन-किर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी झाला आहे. 17 जुलैला भारत आणि इंग्लंड यांच्यातली तिसरी आणि शेवटची वनडे मॅच होणार आहे. या सामन्यासोबतच टीम इंडियाचा इंग्लंड दौराही समाप्त होईल. वनडे सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आहे.

लंडनमध्ये भजन-किर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन अमेरिकन गायक कृष्णा दास (Singer Krishna Das) यांनी केलं होतं. या कार्यक्रमाला विराट आणि अनुष्काने हजेरी लावली. कृष्णा दास यांचा शिष्य हनुमान दास याने विराट-अनुष्का यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रामाचं नाव घेऊन किर्तन आणि भजनाचा कार्यक्रम काही तास चालला. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे.

मॅनचेस्टरमध्ये अखेरचा मुकाबला

भारत आणि इंग्लंड यांच्यातली तिसरी वनडे मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात होणार आहे. या मैदानात दोन्ही टीममध्ये 4 वनडे मॅच खेळवल्या गेल्या, यातल्या फक्त एकच सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला, तर उरलेल्या तिन्ही मॅच इंग्लंडने जिंकल्या. दोन्ही टीममध्ये अखेरची वनडे 2007 साली झाली होती, तेव्हा इंग्लंडचा 3 विकेटने विजय झाला. पहिले बॅटिंग करत टीम इंडियाला 207 रनच करता आले होते. इंग्लंडने 48 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून हे आव्हान पार केलं.

जॉस बटलरच्या नेतृत्वात खेळणारी इंग्लंडच्या बॅटिंगची टॉप ऑर्डर सीरिजमध्ये संघर्ष करत आहे. पहिल्या 3 टी-20 आणि दोन वनडे सामन्यांमध्ये इंग्लंडच्या बॅट्समनना खास कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्या वनडेमध्ये बॉलरच्या कामगिरीमुळे इंग्लंडचा 100 रननी विजय झाला. या सामन्यातही इंग्लंडकडून कोणत्याच बॅट्समनला अर्धशतकही झळकावता आलं नाही.

First published:

Tags: Anushka sharma, India vs england, Virat kohli