मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : अश्विनला तिसऱ्यांदा बाहेर बसवलं, विराटने सांगितलं कारण

IND vs ENG : अश्विनला तिसऱ्यांदा बाहेर बसवलं, विराटने सांगितलं कारण

तिसऱ्या टेस्टमध्येही अश्विनला संधी नाही

तिसऱ्या टेस्टमध्येही अश्विनला संधी नाही

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीने भारतीय टीममध्ये कोणतेही बदल केले नाहीत. त्यामुळे लागोपाठ तिसऱ्या मॅचमध्ये आर.अश्विनला (R Ashwin) संधी मिळाली नाही. विराट कोहलीला याबाबतचं कारण विचारण्यात आलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

हेडिंग्ले, 25 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीने भारतीय टीममध्ये कोणतेही बदल केले नाहीत. हेडिंग्लेमधल्या या टेस्टमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर विराटने आपण लॉर्ड्सवर खेळलेल्या टीमसह मैदानात उतरणार असल्याचं सांगितलं, त्यामुळे लागोपाठ तिसऱ्या मॅचमध्ये आर.अश्विनला (R Ashwin) संधी मिळाली नाही. विराट कोहलीला याबाबतचं कारण विचारण्यात आलं.

'अश्विनला संधी देण्याबाबत आम्ही विचार करत होतो, पण इंग्लंडमधल्या वातावरणात अतिरिक्त फास्ट बॉलर टीममध्ये असणं कायमच फायद्याचं असतं. लॉर्ड्सवरही आपण हेच बघितलं. आम्ही जडेजाकडून (Ravindra Jadeja) जास्त ओव्हर बॉलिंग करून घेऊ, कारण परिस्थिती त्याच्यासाठी योग्य आहे,' असं विराट कोहली म्हणाला. हेडिंग्लेच्या खेळपट्टीवर गवत कमी आहे, त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवशी बॉल स्पिन होऊ शकतो, तेव्हा जडेजा महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.

विराट कोहलीने लॉर्ड्स टेस्टमध्ये जिंकलेल्या 11 खेळाडूंनाच तिसऱ्या टेस्टमध्ये संधी दिली आहे. विराटने त्याच्या कॅप्टन्सीच्या करियरमध्ये फक्त चौथ्यांदा लागोपाठ दोन मॅचमध्ये एकच टीम मैदानात उतरवली आहे.

भारतीय टीम

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंडची टीम

रोरी बर्न्स, हसीम हमीद, डेव्हिड मलान, जो रूट, जॉनी बेयरस्टो, जॉस बटलर, मोईन अली, सॅम करन, क्रेग ओव्हरटन, ओली रॉबिनसन, जेम्स अंडरसन

First published:

Tags: India vs england, R ashwin, Virat kohli