मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : रॉबिनसनच्या बाऊन्सरवर 'हिटमॅन'चा सणसणीत सिक्सर, रोहितच्या अपर कटचा VIDEO

IND vs ENG : रॉबिनसनच्या बाऊन्सरवर 'हिटमॅन'चा सणसणीत सिक्सर, रोहितच्या अपर कटचा VIDEO

रोहित शर्माने मोडला कपिल देव यांचा रेकॉर्ड

रोहित शर्माने मोडला कपिल देव यांचा रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये (India vs England Third Test) रोहित शर्माने (Rohit Sharma) सणसणीत सिक्स लगावला, याचसोबत त्याने कपिल देव (Kapil Dev) यांना मागे टाकलं आहे.

  • Published by:  Shreyas
हेडिंग्ले, 27 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या लीड्स टेस्टमध्ये टीम इंडिया (India vs England Third Test) अडचणीत सापडली आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा 78 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर, इंग्लंडने 432 रनचा डोंगर उभा केला, ज्यामुळे त्यांना 354 रनची आघाडी मिळाली. दुसऱ्या इनिंगमध्येही टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. केएल राहुल (KL Rahul) 8 रन करून आऊट झाला. एकीकडे इंग्लंडची भेदक बॉलिंग सुरू असताना रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. पहिल्या इनिंगमध्येही भारताच्या विकेट जात असताना रोहित शर्मा मैदानात उभा राहिला. 105 बॉलचा सामना करून तो 19 रनवर आऊट झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिनसनने (Ollie Robinson) रोहित शर्माला बाऊन्सर टाकला, पण रोहितने या बॉलला सणसणीत सिक्स मारला. ऑफ स्टम्पच्या बाहेर असलेल्या या बाऊन्सरवर रोहितने अपर कट मारत थर्ड मॅनच्या दिशेने सिक्स लगावली. रॉबिनसनला मारलेल्या या सिक्ससह रोहित शर्मा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितने कपिल देव (Kapil Dev) यांच्या 61 सिक्सचा विक्रम मागे टाकला आहे. भारताकडून सर्वाधिक 90 सिक्स वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) मारले आहेत. रोहित शर्माच्या पुढे सेहवाग, धोनी (MS Dhoni) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहेत. धोनीने टेस्टमध्ये 78 सिक्स आणि सचिनने 69 सिक्स लगावले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे, पण त्याला शतकी खेळी करता आली नाही. रोहितने लॉर्ड्स टेस्टमध्ये 83 रनची खेळी केली होती. या सीरिजमध्ये बाऊन्सरवरच इंग्लंडने रोहितला तीनवेळा आऊट केलं. परदेशी जमिनीवर रोहित शर्माला आतापर्यंत एकदाही टेस्ट शतक लगावता आलेलं नाही.
First published:

Tags: India vs england, Rohit sharma

पुढील बातम्या