मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : रोहितचा करियरमधला सगळ्यात खराब शॉट, VIDEO पाहून म्हणाल हे काय होतं?

IND vs ENG : रोहितचा करियरमधला सगळ्यात खराब शॉट, VIDEO पाहून म्हणाल हे काय होतं?

रोहित शर्मा खराब शॉट खेळून आऊट

रोहित शर्मा खराब शॉट खेळून आऊट

लॉर्ड्स टेस्टमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाने लीड्स टेस्टमध्ये (India vs England Third Test) लाजिरवाणी सुरुवात केली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) या मॅचमध्ये खराब शॉट खेळून आऊट झाला.

  • Published by:  Shreyas

हेडिंग्ले, 25 ऑगस्ट : लॉर्ड्स टेस्टमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाने लीड्स टेस्टमध्ये (India vs England Third Test) लाजिरवाणी सुरुवात केली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेण्याचा निर्णय विराट कोहलीच्या (Virat Kohli) चांगलाच अंगाशी आला. पहिल्या दिवशी फक्त 40 ओव्हरमध्येच टीम इंडियाचा 78 रनवर ऑल आऊट झाला. दिवसाच्या सुरुवातीपासूनच जेम्स अंडरसनने (James Anderson) भारताला धक्के दिले.

लॉर्ड्स टेस्टमध्ये शतक करणारा केएल राहुल (KL Rahul) या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झाला, तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 1 रन करून आणि कर्णधार विराट कोहली 7 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी भारताची इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला, पण लंचआधी अजिंक्य रहाणेही आऊट झाला.

ओपनिंगला आलेला रोहित शर्मा दुसरीकडून टीम इंडियाची पडझड थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण अत्यंत खराब शॉट मारून रोहित शर्मा आऊट झाला. क्रेग ओव्हरटनने (Craig Overton) ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेला बॉल रोहितने लेग साईडच्या दिशेने मारला, पण मिड ऑनच्या दिशेला उभ्या असलेल्या ओली रॉबिनसनने (Ollie Robinson) रोहितचा अगदी सोपा कॅच पकडला. 105 बॉलमध्ये 19 रन करून रोहित शर्मा आऊट झाला.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तिन्ही टेस्टमध्ये रोहित शर्माला चांगली सुरूवात मिळाली, पण त्याला मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं आहे. लॉर्ड्स टेस्टमध्येही रोहितने केएल राहुलसोबत टीम इंडियाला शतकी पार्टनरशीप करून दिली होती. सीरिजच्या तिन्ही टेस्टमध्ये रोहित शर्माने खेळलेल्या शॉट्सवर प्रश्न उपस्थित केले गेले. याआधी या सीरिजमध्ये रोहित शर्मा दोनवेळा हूक शॉट मारताना आऊट झाला. इंग्लंडच्या टीमने रोहित शर्मावर बाऊन्सर मारा केला आणि मिड विकेट, फाईन लेगला फिल्डर ठेवला. इंग्लंडने रचलेल्या या सापळ्यात रोहित अडकला आणि पूल शॉट मारण्याच्या नादात फिल्डरला कॅच देऊन बसला

First published:

Tags: India vs england, Rohit sharma