मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : मिडल ऑर्डरच्या संघर्षात लपलं या खेळाडूचं अपयश, टीम बाहेर करण्याची मागणी

IND vs ENG : मिडल ऑर्डरच्या संघर्षात लपलं या खेळाडूचं अपयश, टीम बाहेर करण्याची मागणी

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England Third Test) इनिंग आणि 76 रनने पराभव झाला. दिवसाची सुरुवात 215/2 अशी केल्यानंतर पुढच्या 63 रनमध्ये टीम इंडियाचा ऑल आऊट झाला.

  • Published by:  Shreyas

हेडिंग्ले, 28 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England Third Test) इनिंग आणि 76 रनने पराभव झाला. दिवसाची सुरुवात 215/2 अशी केल्यानंतर पुढच्या 63 रनमध्ये टीम इंडियाचा ऑल आऊट झाला. गेल्या काही काळापासून संघर्ष करणारी टीम इंडियाची मिडल ऑर्डर पुन्हा एकदा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, त्यामुळे चौथ्या टेस्टसाठी टीममध्ये बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) पुढच्या टेस्टमध्ये टीममध्ये बदल होतील, असे संकेत दिले आहेत.

विराट कोहलीने सीरिजच्या 5 इनिंगमध्ये 24.80 च्या सरासरीने 124 रन केले. तर अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) 5 इनिंगमध्ये 19 च्या सरासरीने 95 रन करता आल्या. चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) 32.40 च्या सरासरीने 162 रन केले. भारताचे हे तिन्ही दिग्गज सीरिजमध्ये अपयशी ठरत आहेत, पण या तिघांच्या फ्लॉप कामगिरीमागे ऋषभ पंतचं (Rishabh Pant) अपयश लपत आहे.

लीड्स टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये पंतला फक्त 3 रन करता आले. पहिल्या इनिंगमध्ये तो 2 रन करून आऊट झाला, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला फक्त 1 रन करता आली. दोन्ही इनिंगमध्ये ओली रॉबिनसनने त्याला आऊट केलं. पंतने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 3 टेस्टच्या 5 इनिंगमध्ये फक्त 17.40 च्या सरासरीने 87 रन केले, यात 37 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर होता.

सीरिजमध्ये जेव्हा टीमला गरज पडली तेव्हा पंतने निराशा केली. तिन्ही टेस्टमध्ये त्याच्या शॉट सिलेक्शनवरही टीका होत आहे. बहुतेकवेळा बाहेर जाणारा बॉल खेळण्याच्या नादात पंतने आपली विकेट गमावली. पंतचं अशाप्रकारे आऊट होण्यामुळे क्रिकेट चाहते मात्र चांगलेच संतापले आहेत. चौथ्या टेस्टमध्ये ऋद्धीमान साहाला (Wriddhiman Saha) संधी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

एमएस धोनीने (MS Dhoni) निवृत्ती घेतल्यानंतर ऋद्धीमान साहा टीमचा मुख्य विकेट कीपर झाला. साहाने आपल्या विकेट कीपिंगने सगळ्यांना प्रभावित केलं, पण त्याच्या बॅटमधून रन येत नव्हत्या, त्यामुळे ऋषभ पंतला टीममध्ये संधी देण्यात आली. पंतने या संधीचं सोनं केलं आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 टेस्टमध्ये 68 च्या सरासरीने 274 रन केले. आता ऋषभ पंत संघर्ष करत असल्यामुळे त्याच्याऐवजी विराट पुन्हा साहाला संधी देणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 2 सप्टेंबरपासून ओव्हलमध्ये चौथ्या टेस्टला सुरुवात होणार आहे.

First published:

Tags: India vs england, Rishabh pant