मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : लीड्सवर टीम इंडियाने लाज घालवली, कागदी शेर 78 रनवर ऑल आऊट

IND vs ENG : लीड्सवर टीम इंडियाने लाज घालवली, कागदी शेर 78 रनवर ऑल आऊट

टीम इंडियाची बॅटिंग गडगडली

टीम इंडियाची बॅटिंग गडगडली

लॉर्ड्स टेस्टवर ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर टीम इंडियाने (India vs England Third Test) लीड्स टेस्टमध्ये लाजिरवाणी कामगिरी केली आहे.

  • Published by:  Shreyas

हेडिंग्ले, 25 ऑगस्ट : लॉर्ड्स टेस्टवर ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर टीम इंडियाने (India vs England Third Test) लीड्स टेस्टमध्ये लाजिरवाणी कामगिरी केली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय टीम इंडियाच्या चांगलाच अंगाशी आला. फक्त 78 रनवर टीम इंडियाचा ऑल आऊट झाला आहे. दिवसाच्या पहिल्या 50 मिनिटांमध्येच टीम इंडियाने सुरुवातीचे तीन शिलेदार गमावले. लॉर्ड्स टेस्टमध्ये शतक करणारा केएल राहुल (KL Rahul) शून्य रनवर, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 1 रनवर आणि विराट कोहली (Virat Kohli) 7 रन करून आऊट झाला. यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) टीम इंडियाचा डाव सावरण्यास मदत केली, पण अजिंक्य रहाणे लंचच्या आधी आऊट झाला. लंचनंतरही रोहित शर्मा किल्ला लढवण्याचा प्रयत्न करत होता, पण तोदेखील खराब शॉट मारून पॅव्हेलियनमध्ये परतला. टीम इंडियाच्या विकेटची पडझड सुरूच राहिली. इंग्लंडकडून जेम्स अंडरसन (James Anderson) आणि क्रेग ओव्हरटन यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, तर ओली रॉबिनसन, सॅम करन यांना प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं.

टीम इंडियाचा स्कोअर 67/5 एवढा होता, पण काही क्षणांच्या आतच एकही रन न काढता टीमने 4 विकेट गमावल्या आणि हीच अवस्था 67/9 एवढी झाली.

लॉर्ड्स टेस्टमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या 11 जणांनाच विराटने टीममध्ये संधी दिली आहे, त्यामुळे आर.अश्विनला (R Ashwin) पुन्हा एकदा टीमबाहेर बसावं लागलं आहे. तर इंग्लंडने टीममध्ये दोन बदल केले आहेत डॉम सिबलीच्या जागी डेव्हिड मलान (David Malan) आणि मार्क वूडच्या जागी क्रेग ओव्हरटन (Craig Overton) यांचा टीममध्ये समावेश झाला आहे.

लॉर्ड्स टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत टीम इंडियाने 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. नॉटिंघममध्ये झालेली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती.

भारतीय टीम

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

First published:

Tags: India vs england, Virat kohli