Home /News /sport /

IND vs ENG : बेयरस्टोने एका हातात पकडला भन्नाट कॅच, राहुललाही बसला धक्का, VIDEO

IND vs ENG : बेयरस्टोने एका हातात पकडला भन्नाट कॅच, राहुललाही बसला धक्का, VIDEO

बेयरस्टोने पकडला भन्नाट कॅच

बेयरस्टोने पकडला भन्नाट कॅच

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडिया अडचणीत (India vs England Third Test) सापडली आहे. केएल राहुल (KL Rahul) पुन्हा एकदा लवकर आऊट झाला. क्रेग ओव्हरटनच्या (Craig Overton) बॉलिंगवर स्लिपमध्ये असलेल्या जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) एका हातात भन्नाट कॅच पकडला.

पुढे वाचा ...
    हेडिंग्ले, 27 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडिया अडचणीत (India vs England Third Test) सापडली आहे. पहिल्या इनिंगमध्ये 78 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर इंग्लंडने 432 रनचा डोंगर उभारला, त्यामुळे त्यांना 354 रनची आघाडी मिळाली. यानंतर भारताला चांगल्या सुरुवातीची गरज होती, पण फॉर्ममध्ये असलेला केएल राहुल (KL Rahul) पुन्हा एकदा लवकर आऊट झाला. क्रेग ओव्हरटनच्या (Craig Overton) बॉलिंगवर स्लिपमध्ये असलेल्या जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) एका हातात भन्नाट कॅच पकडला. 54 बॉलमध्ये 8 रन करून केएल राहुल आऊट झाला. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये राहुल शून्य रनवर माघारी परतला होता. जेम्स अंडरसनने राहुलला आऊट केलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये राहुलने अर्धशतकी खेळी केली होती. 84 रन करून राहुल आऊट झाला, तर लॉर्ड्स टेस्टमध्ये राहुलने शतक झळकावलं होतं. राहुलच्या या दोन्ही खेळींमुळे भारताला पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये चांगली सुरुवात मिळाली होती. लॉर्ड्स टेस्टमध्ये तर टीम इंडियाने ऐतिहासिक विजयही मिळवला. लीड्समध्ये मात्र राहुलची बॅट शांत राहिली. पहिल्या इनिंगमध्ये राहुल शून्य रनवर आऊट झाल्यानंतर भारताची बॅटिंग गडगडली आणि टीमचा फक्त 78 रनवर ऑल आऊट झाला. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. ट्रेन्ट ब्रीजमध्ये झालेली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Kl rahul

    पुढील बातम्या