मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : पुजारा-रहाणे नाही, या खेळाडूला संधी द्या, एकहाती फिरवेल मॅच!

IND vs ENG : पुजारा-रहाणे नाही, या खेळाडूला संधी द्या, एकहाती फिरवेल मॅच!

तिसऱ्या टेस्टमध्ये रहाणे-पुजाराला संधी मिळणार?

तिसऱ्या टेस्टमध्ये रहाणे-पुजाराला संधी मिळणार?

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 25 ऑगस्ट म्हणजेच बुधवारपासून तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. भारताचे माजी विकेटकीपर फारुख इंजिनियर (Farokh Engineer) यांनी तिसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये बदल करण्याचा सल्ला दिला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

लंडन, 22 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 25 ऑगस्ट म्हणजेच बुधवारपासून तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. लॉर्ड्स टेस्टमध्ये (Lords Test) ऐतिहासिक विजय मिळवून टीम इंडियाने 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. या विजयामुळे विराट कोहली टीममध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे, पण भारताचे माजी विकेटकीपर फारुख इंजिनियर (Farokh Engineer) यांनी तिसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये बदल करण्याचा सल्ला दिला आहे.

स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये फारुख इंजिनियर म्हणाले, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणेऐवजी (Ajinkya Rahane) सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) हेडिंग्ली टेस्टमध्ये मी संधी दिली असती. मी त्याचा मोठा फॅन आहे. तो एक क्लास खेळाडू आहे. पुजारा आणि रहाणेपण चांगले बॅट्समन आहेत, पण सूर्यकुमार मॅच विनर आहे. त्याला टीममध्ये संधी मिळाली पाहिजे.

'सूर्यकुमार यादव आक्रमक खेळाडू आहे. तो जलद शतक करू शकतो, तसंच गरज पडली तर वेगाने 70-80 रन करण्याची क्षमताही त्याच्यात आहे. तो फिल्डरही चांगला आहे. हेडिंग्ली टेस्टमध्ये त्याला संधी मिळाली तर तो ट्रम्प कार्ड ठरू शकतो,' असं फारुख इंजिनियर यांना वाटतं.

'कोणताही कर्णधार जिंकलेल्या टीममध्ये बदल करू इच्छित नाही. पण माझ्यामते सगळं काही खेळपट्टीवर अवलंबून आहे. खेळपट्टीमध्ये फार काही बदल होतील, असं वाटत नाही. हेडिंग्लीची विकेट कायमच बॅट्समनसाठी चांगली राहिली आहे, त्यामुळे सूर्यकुमार यादव टीममध्ये पाहिजे. तो टीमसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो,' अशी प्रतिक्रिया फारुख इंजिनियर यांनी दिली.

सूर्यकुमारने यावर्षी टी-20 आणि वनडे क्रिकेटमध्ये धमाक्यात पदार्पण केलं. तीन वनडे मॅचमध्ये एका अर्धशतकासह त्याने 124 रन केले. तर 4 टी-20 मध्ये 2 अर्धशतकांसह त्याला 139 रन करता आले. सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळले होते. इंग्लंड दौऱ्यातल्या खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर या दोघांना श्रीलंकेहून बोलावण्यात आलं.

First published:

Tags: Ajinkya rahane, India vs england, Pujara, Suryakumar yadav