मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : लॉर्ड्सच्या पराभवानंतर इंग्लंडचा धक्कादायक निर्णय, भारताला त्रास देणारा खेळाडू बाहेर

IND vs ENG : लॉर्ड्सच्या पराभवानंतर इंग्लंडचा धक्कादायक निर्णय, भारताला त्रास देणारा खेळाडू बाहेर

इंग्लंड क्रिकेटचा धक्कादायक निर्णय

इंग्लंड क्रिकेटचा धक्कादायक निर्णय

भारताविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा (India vs England) दारूण पराभव झाला. यानंतर इंग्लंड क्रिकेटने हैराण करणारा निर्णय घेतला आहे.

लंडन, 19 ऑगस्ट : भारताविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा (India vs England) दारूण पराभव झाला. यानंतर इंग्लंड क्रिकेटने हैराण करणारा निर्णय घेतला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 25 ऑगस्टपासून तिसऱ्या टेस्टला सुरुवात होणार आहे, त्याआधी ऑलराऊंडर मोईन अलीला (Moeen Ali) टीममधून रिलीज करण्यात आलं आहे. मोईन अलीला द हंड्रेड (The Hundred) स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे. मोईन अली द हंड्रेडमध्ये बर्मिंघम फिनिक्सचा कर्णधार आहे, त्याच्या टीमने फायनलमध्ये स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेची फायनल 21 ऑगस्टला होणार आहे. फायनलमध्ये बर्मिंघमचा सामना कोणाशी होईल, हे शुक्रवारी ठरणार आहे. या स्पर्धेचा एलिमिनेटर सामना सदर्न ब्रेव आणि ट्रेन्ट रॉकेट्स यांच्यात होईल.

मोईन अलीसह इंग्लंडच्या टीमने क्रेग ओव्हरटनलाही (Craig Overton) रिलीज केलं आहे. ओव्हरटर्न सदर्न ब्रेव टीमचा भाग आहे. दुसरीकडे याच टीमचे फिन एलन (Fin Allen) आणि कॉलिन डि ग्रॅण्डहोम (Collin De Grandhome) न्यूझीलंड टीमशी जोडले गेले आहेत, त्यामुळे हे दोघं एलिमिनेटरमध्ये खेळणार नाहीत. द हंड्रेड स्पर्धा 21 ऑगस्टला संपणार आहे, तर तिसरी टेस्ट 25 ऑगस्टपासून होणार आहे. लॉर्ड्सवर झालेल्या पराभवानंतर दोन खेळाडूंना रिलीज करण्याच्या इंग्लंडच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बुधवारी इंग्लंडने लीड्स टेस्टसाठीच्या टीमची घोषणा केली. पहिल्या दोन टेस्टमधल्या तीन खेळाडूंना बाहेर करण्यात आलं, यामध्ये डॉम सिबली, जॅक क्रॉले आणि जॅक लीच यांचा समावेश आहे. तर टी-20 मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या डेव्हिड मलान याला टेस्ट टीममध्ये संधी देण्यात आली आहे. फास्ट बॉलर साकिब महमूदही टीममध्ये आला आहे. दुसऱ्या टेस्टदरम्यान दुखापत झालेल्या मार्क वूडचं स्थानही कायम आहे.

लीड्स टेस्टसाठी इंग्लंडची टीम

जो रूट, जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, रॉरी बर्न्स, जॉस बटलर, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, साकिब महमूद, डेविड मलान, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिनसन, मार्क वूड

First published:

Tags: India vs england