मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : 'तो' परत आलाय! टीम इंडियाला त्रास देणारा 17 वर्षानंतर पुन्हा मैदानात

IND vs ENG : 'तो' परत आलाय! टीम इंडियाला त्रास देणारा 17 वर्षानंतर पुन्हा मैदानात

तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची कठोर परीक्षा

तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची कठोर परीक्षा

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs England Third Test) लाजिरवाणी कामगिरी केली आहे. टेस्टच्या पहिल्याच दिवशी 40 ओव्हरमध्येच टीम इंडियाचा 78 रनवर ऑल आऊट झाला.

  • Published by:  Shreyas

हेडिंग्ले, 25 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs England Third Test) लाजिरवाणी कामगिरी केली आहे. टेस्टच्या पहिल्याच दिवशी 40 ओव्हरमध्येच टीम इंडियाचा 78 रनवर ऑल आऊट झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोघांनाच दोन आकडी स्कोअर करता आला. भारताचे इतर सगळे खेळाडू एक आकडी स्कोअरवर आऊट झाला. वयाच्या 40व्या वर्षीही जेम्स अंडरसन (James Anderson) याने त्याच्या भेदक बॉलिंगने टीम इंडियाला धक्के दिले. पहिल्या 50 मिनिटांमध्येच अंडरसनने केएल राहुल (KL Rahul), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि विराट कोहली (Virat Kohli) या तिघांना आऊट केलं.

जेम्स अंडरसनने सुरुवातीलाच टीम इंडियाला धक्के दिले असले, तरी 17 वर्षांपूर्वी टीम इंडियाला त्रास देणारा आज पुन्हा एकदा मैदानात दिसला. इंग्लंडचा माजी फास्ट बॉलर असलेले एलेक्स व्हार्फ (Alex Wharf) याने टेस्ट अंपायर म्हणून मैदानात पदार्पण केलं आहे. 2004 साली भारताविरुद्ध पदार्पणाच्या मॅचमध्येच एलेक्स व्हार्फ यांनी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला होता.

व्हार्फ यांनी इंग्लंडकडून खेळताना 18 विकेट घेतल्या होत्या. 13 वनडेमध्ये त्यांनी इंग्लंडचं प्रतिनिधीत्व केलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साऊथम्पटनमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final) एलेक्स व्हार्फ फोर्थ अंपायर होते. 8 वनडे आणि 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये व्हार्फ यांनी मैदानात अंपायरिंग केली आहे. याशिवाय ते एक वनडे आणि 3 टी-20 मध्ये टीव्ही अंपायर होते.

2004 साली व्हार्फ यांनी ट्रेन्ट ब्रीजमध्ये भारताविरुद्धच्या वनडेमधून पदार्पण केलं होतं. 30 रनवर 3 विकेट घेतल्यामुळे व्हार्फ यांना मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं होतं. त्या सामन्यात व्हार्फ यांनी तेव्हाचा भारताचा कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly), व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) आणि राहुल द्रविडची (Rahul Dravid) विकेट घेतली होती. व्हार्फ यांच्या या कामगिरीमुळे भारताचा 170 रनवर ऑल आऊट झाला होता. इंग्लंडने तो सामना 7 विकेटने जिंकला होता.

2004 च्या त्या सीरिजमध्ये व्हार्फ भारताविरुद्ध आणखी दोन वनडे खेळले, यातल्या दुसऱ्या वनडेमध्ये त्यांनी 1/36 आणि तिसऱ्या मॅचमध्ये 2/41 अशी कामगिरी केली. 13 वनडेमध्ये त्यांना 18 विकेट घेता आल्या. फेब्रुवारी 2005 साली सेन्च्युरियनमध्ये व्हार्फ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळले. डिसेंबर 2004 साली झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये 24 रन देऊन 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

First published:

Tags: India vs england