Home /News /sport /

IND vs ENG : पुजारा पुन्हा आला! इंग्लंडच्या 'टेस्ट'साठी अशी आहे टीम इंडिया!

IND vs ENG : पुजारा पुन्हा आला! इंग्लंडच्या 'टेस्ट'साठी अशी आहे टीम इंडिया!

Photo-BCCI

Photo-BCCI

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी (India vs England) टीम इंडियाची निवड झाली आहे. इंग्लंड दौऱ्यामध्ये टीम इंडिया एकमेव टेस्ट मॅच खेळणार आहे. या सीरिजसाठी चेतेश्वर पुजाराचं (Cheteshwar Pujara) टीम इंडियात कमबॅक झालं आहे.

    मुंबई, 22 मे : टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी (India vs England) टीम इंडियाची निवड झाली आहे. इंग्लंड दौऱ्यामध्ये टीम इंडिया एकमेव टेस्ट मॅच खेळणार आहे. या सीरिजसाठी चेतेश्वर पुजाराचं (Cheteshwar Pujara) टीम इंडियात कमबॅक झालं आहे. मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यात आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत खराब कामगिरी केल्यानंतर पुजाराला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमधून बाहेर करण्यात आलं होतं, पण काऊंटी क्रिकेटमध्ये पुजाराने उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्याचा टीम इंडियातल्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला. काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये ससेक्सकडून खेळताना पुजाराने 7 इनिंगमध्ये त्याने 143.4 च्या सरासरीने 717 रन केले, यात त्याच्या नावावर दोन द्विशतकं आणि 4 शतकं होती. आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, पण इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी हे तिन्ही खेळाडू मैदानात उतरणार आहेत. दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक-कार्तिकचं कमबॅक, रोहितच्या मित्राला धक्का 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एकमेव टेस्ट होणार आहे. मागच्या वर्षी न झालेल्या सीरिजची ही अखेरची मॅच आहे. कोरोनामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातली शेवटची टेस्ट स्थगित करण्यात आली होती. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. इंग्लंड टेस्टसाठी टीम इंडिया रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Team india

    पुढील बातम्या