मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : लीड्स टेस्टमध्ये नवा वाद, अंपायरचे पंतच्या ग्लोव्हजवर आक्षेप, कारण...

IND vs ENG : लीड्स टेस्टमध्ये नवा वाद, अंपायरचे पंतच्या ग्लोव्हजवर आक्षेप, कारण...

ऋषभ पंतच्या ग्लोव्हजवरून वाद

ऋषभ पंतच्या ग्लोव्हजवरून वाद

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टचा दुसरा दिवस टीम इंडियाच्या बॉलर्ससाठी निराशाजनक राहिला. पण ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) ग्लोव्हजवरून मैदानात वाद पाहायला मिळाला.

  • Published by:  Shreyas
हेडिंग्ले, 27 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टचा दुसरा दिवस टीम इंडियाच्या बॉलर्ससाठी निराशाजनक राहिला. इंग्लंडने त्यांचा कर्णधार जो रूटच्या (Joe Root) शतकाच्या मदतीने 8 विकेट गमावून 423 रन केले, त्यामुळे त्यांना 345 रनची आघाडी मिळाली. रूटने 165 बॉलमध्ये 14 फोरच्या मदतीने 121 रनची खेळी केली. या सीरिजच्या तिसऱ्या टेस्टमधलं हे त्याचं तिसरं शतक होतं. मॅचच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) ग्लोव्हजवरून मैदानात वाद पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असताना कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि ऋषभ पंत मैदानात अंपायरची चर्चा करताना दिसले. तिसरं सत्र सुरू व्हायच्या आधी अंपायर एलेक्स व्हार्फ आणि रिचर्ड कॅटलबोरो यांनी ऋषभ पंतला ग्लोव्हजवर लावलेल्या टेप हटवायला लावल्या. ही टेप पंतच्या ग्लोव्हजच्या चौथ्या आणि पाचव्या बोटाला दिसत होती. एमसीसीच्या नियमांनुसार हे अयोग्य होतं. क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या एमसीसीच्या कायदा 27.2 मध्ये विकेट कीपरच्या ग्लोव्हजबाबत सांगण्यात आलं आहे. यानुसार तर्जनी आणि अंगठ्याला जोडण्याशिवाय बोटांमध्ये काहीही जोडलेलं नसावं. चहाच्या विश्रांतीआधी ऋषभ पंतने डेव्हिड मलानचा कॅच पकडला, यानंतर अंपायरनी पंतला ग्लोव्हजवरच्या टेप काढायला लावल्या. त्यावेळी कॉमेंटेटर नासीर हुसेन आणि डेव्हिड लॉईड यांनी प्रेक्षकांना हा मुद्दा स्पष्ट करून सांगितला. लीड्स टेस्टमध्ये टीम इंडिया पराभवाच्या छायेत सापडली आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा 78 रनवर ऑल आऊट झाला. यानंतर इंग्लंडने 432 रन केले, यामुळे त्यांना तब्बल 354 रनची आघाडी मिळाली. या टेस्ट मॅचचे आणखी दोन दिवस बाकी असल्यामुळे आता या मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव जवळपास अशक्य आहे.
First published:

Tags: India vs england, Rishabh pant

पुढील बातम्या