Home /News /sport /

IND vs ENG : टीम इंडिया 11 दिवसांमध्ये 6 मॅच खेळणार, रोहितचं कमबॅक, पाहा Full Schedule

IND vs ENG : टीम इंडिया 11 दिवसांमध्ये 6 मॅच खेळणार, रोहितचं कमबॅक, पाहा Full Schedule

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England T20 Series) 7 विकेटने दारूण पराभव झाला. यानंतर आता दोन्ही टीममध्ये गुरूवारपासून 3 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे.

    मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England T20 Series) 7 विकेटने दारूण पराभव झाला. यानंतर आता दोन्ही टीममध्ये गुरूवारपासून 3 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे. टी-20 सीरिजनंतर 3 वनडे मॅचही (ODI Series) होणार आहेत. टेस्ट मॅचआधी रोहित शर्माची (Rohit Sharma) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तो हा सामना खेळू शकला नव्हता, पण आता रोहित फिट झाला आहे. टी-20 आणि वनडे सीरिजमध्ये भारतीय टीम रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळेल. रोहित 112 दिवसांनी टीम इंडियाकडून खेळणार आहे, त्याने भारताकडून अखेरची मॅच 14 मार्चला खेळली होती. यानंतर तो आयपीएल खेळला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी रोहितला आराम देण्यात आला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 आणि वनडे सीरिज मिळून 6 मॅच होणार आहेत. या दोन्ही सीरिज 7 जुलै ते 17 जुलैदरम्यान होणार आहेत, म्हणजेच दोन्ही टीम 11 दिवसांमध्ये 6 मॅच खेळणार आहेत. पहिली टी-20 मॅच साऊथम्पटनमध्ये होईल, हा सामना डे-नाईट असल्यामुळे भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होणार आहे. सीरिजचा दुसरा सामना 9 जुलैला बर्मिंघममध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता आणि तिसरी टी-20 10 जुलैला नॉटिंघमला संध्याकाळी 7 वाजताच सुरू होईल. टी-20 सीरिजनंतर वनडे सीरिजचे सामने 12, 14 आणि 17 जुलैला होतील. पहिल्या दोन वनडे डे-नाईट आहेत, त्यामुळे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होतील. तिसरी वनडे भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता खेळवली जाईल. भारत-इंग्लंड सीरिजचं वेळापत्रक 7 जुलै, पहिली टी-20- भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता 9 जुलै, दुसरी टी-20- भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता 10 जुलै, तिसरी टी-20- भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता 12 जुलै, पहिली वनडे- भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता 14 जुलै, दुसरी वनडे- भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता 17 जुलै, तिसरी वनडे- भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Rohit sharma, Team india

    पुढील बातम्या