• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : सूर्यकुमार-पृथ्वी इंग्लंडला रवाना, या दिवशी होणार टीम इंडियात दाखल

IND vs ENG : सूर्यकुमार-पृथ्वी इंग्लंडला रवाना, या दिवशी होणार टीम इंडियात दाखल

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासाठी (India vs England) दिलासादायक बातमी आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) कोलंबोहून इंग्लंडसाठी रवाना झाले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 3 ऑगस्ट : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासाठी (India vs England) दिलासादायक बातमी आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) कोलंबोहून इंग्लंडसाठी रवाना झाले आहेत. सूर्यकुमार यादवने ट्वीट करून इंग्लंडला रवाना होत असल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली. पुढचा स्टॉप इंग्लंड, असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं आहे. दोन्ही बॅट्समननी तीन दिवसांपूर्वीच इंग्लंडला रवाना होणं अपेक्षित होतं, पण व्हिजाच्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे त्यांना श्रीलंकेतच थांबावं लागलं. शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाल्यामुळे बदली खेळाडू म्हणून या दोघांची निवड झाली. दोन्ही बॅट्समन उद्या सकाळी इंग्लंडमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. तिकडे पोहोचल्यानंतर दोघांना कमीत कमी 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर दोघं टेस्ट सीरिज खेळण्यासाठी उपलब्ध होतील. श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियासोबत असलेल्या पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवला अखेरच्या दोन टी-20 खेळता आल्या नव्हत्या, कारण कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या कृणाल पांड्याच्या (Krunal Pandya) संपर्कात दोघं आले होते, त्यामुळे त्यांना आयसोलेशनमध्ये जावं लागलं होतं. सूर्यकुमार आणि पृथ्वीने श्रीलंका दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. शॉने 3 सामन्यांमध्ये 35 च्या सरासरीने 105 रन केले, तर सूर्यकुमार यादवनेही इतक्याच सामन्यांमध्ये 62 च्या सरासरीने 124 रन बनवले. सूर्यकुमार यादवने अजून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं नाही. याचवर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधली त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. 77 सामन्यांमध्ये 44 पेक्षा जास्तच्या सरासरीने त्याने 5,326 रन केले, यात 14 शतकांचा समावेश आहे. दुसरीकडे शॉने 5 टेस्टमध्ये 42 च्या सरासरीने 339 रन केले. शॉने पदार्पणाच्या आपल्या टेस्टमध्येच शतक केलं होतं. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एडलेड टेस्टमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर शॉला टीमबाहेर करण्यात आलं, पण विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने धमाकेदार कामगिरी केली. 8 सामन्यांमध्ये 165 च्या सरासरीने त्याने 827 रन ठोकले, यामध्ये 4 शतकं होती.
  Published by:Shreyas
  First published: