Home /News /sport /

IND vs ENG : 5 महिन्यांमध्ये बदललं सूर्याचं आयुष्य, करियरने गाठली वेगळीच उंची

IND vs ENG : 5 महिन्यांमध्ये बदललं सूर्याचं आयुष्य, करियरने गाठली वेगळीच उंची

सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) इंग्लंड दौऱ्यासाठीच्या टेस्ट टीममध्ये निवड झाली आहे. तीन खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांना टीममध्ये सामील करण्यात आलं आहे.

    मुंबई, 26 जुलै : सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) इंग्लंड दौऱ्यासाठीच्या टेस्ट टीममध्ये निवड झाली आहे. तीन खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांना टीममध्ये सामील करण्यात आलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला (India vs England) 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC) पुढच्या सत्राची ही पहिलीच सीरिज असणार आहे, त्यामुळे याची सुरुवात चांगला करण्याचा टीमचा प्रयत्न असेल. 2018 साली झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला 4-1 ने पराभव पत्करावा लागला होता. सूर्यकुमार यादवने 14 मार्च 2021 ला इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन केलं. पहिल्या सामन्यामध्ये त्याला बॅटिंगची संधी मिळाली नव्हती. 18 जुलैला त्याला पहिल्यांदा वनडे क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली, आता तर त्याची टेस्ट टीममध्येही निवड झाली आहे. मार्च ते जुलै या 5 महिन्यांमध्ये सूर्याच्या आंतरराष्ट्रीय करियरने मोठी उडी घेतली आहे. सूर्यकुमार यादवने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची धमाकेदार सुरुवात केली. आपल्या पहिल्याच टी-20 इनिंगमध्ये त्याने अर्धशतक केलं, एवढच नाही तर पहिल्याच बॉलला त्याने जोफ्रा आर्चरला शानदार सिक्स मारला. 4 पैकी 3 टी-20 मध्ये त्याला बॅटिंगची संधी मिळाली, यातल्या 2 मॅचमध्ये त्याने अर्धशतक केलं. 46 च्या सरासरीने त्याने 139 रन केले आहेत, त्याचा स्ट्राईक रेटही 170 चा आहे. तर तीन वनडेमध्ये त्याने 62 च्या सरासरीने 124 रन केले आणि एक अर्धशतक केलं, यातल्या प्रत्येक इनिंगमध्ये त्याने 30 पेक्षा जास्तचा स्कोअर केला, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 123 चा आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 77 मॅचच्या 129 इनिंगमध्ये 44 च्या सरासरीने 5,326 रन केले, यामध्ये 14 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. 200 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. सूर्यकुमार यादवला टेस्ट सीरिजमध्ये मधल्या फळीत संधी मिळू शकते. गेल्या काही काळापासून टीम इंडियाची मधली फळी संघर्ष करत आहे. 1 जानेवारी 2020 पासून टीम इंडियाच्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूंची कामगिरी 11 टीममधली सगळ्यात खराब आहे. भारतीय बॅट्समननी फक्त 30 च्या सरासरीने रन केले, यात एक शतक आणि 6 अर्धशतकं आहेत. इंग्लंड (42), न्यूझीलंड (41), श्रीलंका (38), ऑस्ट्रेलिया (33), झिम्बाब्वे (33) या टीमची सरासरीही भारतापेक्षा जास्त आहे. चौथ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) खेळतो, ज्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अजिंक्य सध्या दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Suryakumar yadav

    पुढील बातम्या