मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : लीड्सच्या पराभवानंतर गावसकर गरजले, या खेळाडूला बाहेर करणार विराट!

IND vs ENG : लीड्सच्या पराभवानंतर गावसकर गरजले, या खेळाडूला बाहेर करणार विराट!

गावसकरांचा विराटला टीम बदलण्याचा सल्ला

गावसकरांचा विराटला टीम बदलण्याचा सल्ला

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England Third Test) लाजिरवाणा पराभव झाला आहे. या मॅचनंतर सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचा सल्ला विराट कोहलीला (Virat Kohli) दिला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 28 ऑगस्ट : लॉर्ड्स टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर लीड्स टेस्टमधून चाहत्यांना टीम इंडियाकडून (India vs England Third Test) फार अपेक्षा होत्या, पण विराटच्या टीमने निराशाजनक कामगिरी केली आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि 76 रनने पराभव झाला आहे. पहिल्या इनिंगमध्ये 78 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाला 278 रन करता आले. आता 5 टेस्ट मॅचची ही सीरिज बरोबरीत आहे.

लीड्स टेस्टमधल्या पराभवानंतर सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीमच्या प्लेयिंग इलेव्हनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ओव्हल टेस्टमध्ये टीमने आपल्या प्लेयिंग इलेव्हनबाबत विचार करण्याची गरज आहे, असं रोखठोक मत गावसकर यांनी मांडलं आहे.

सोनी नेटवर्कसोबत कॉमेंट्री करताना गावसकर म्हणाले, 'भारतीय टीमला आता आपल्या प्लेयिंग इलेव्हनबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. ऋषभ पंतने (Rishabh Pant) तीनही टेस्टमध्ये रन केलेले नाहीत. आता चौथ्या टेस्टमध्ये अधिकचा बॅट्समन घेऊन खेळण्याबाबत विचार करावा लागेल. टीम इंडिया जर 4 बॉलर आणि 7 बॅट्समन घेऊन मैदानात उतरले तर ही रणनिती योग्य ठरेल, कारण सध्या बॅटिंग ही भारतीय टीमची कमजोरी आहे.'

लीड्स टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) टीममध्ये बदलाचे संकेत दिले. पुढच्या टेस्टमध्ये टीम बदलण्याबाबत विचार करू, कारण प्रत्येक खेळाडूला चार टेस्ट खेळवल्या जाऊ शकत नाहीत. तीन टेस्टनंतरच्या थकव्याबाबत विराट बोलला होता.

लीड्स टेस्टच्या चौथ्या दिवशी भारतीय टीमची बॅटिंग पुन्हा एकदा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत भारताचा स्कोअर 2 विकेट गमावून 215 रन एवढा झाला होता. विराट आणि पुजाराकडून टीमला मोठ्या स्कोअरची अपेक्षा होती. पण ओली रॉबिनसनच्या भेदक बॉलिंगनी भारतीय चाहत्यांची अपेक्षा धुळीला मिळवली. 63 रनमध्येच भारताने शेवटच्या 8 विकेट गमावल्या.

First published:

Tags: India vs england, Rishabh pant, Sunil gavaskar, Virat kohli